Home /News /videsh /

सात मार्चला होणार मोठा खुलासा, प्रिन्स हॅरी सांगणार राजघराण्यासोबतचे संबंध तोडण्यामागचं कारण

सात मार्चला होणार मोठा खुलासा, प्रिन्स हॅरी सांगणार राजघराण्यासोबतचे संबंध तोडण्यामागचं कारण

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) 7 मार्चला कॉमनवेल्थचा (Commonwealth) सोहळा साजरा करताना टीव्हीवर दिसणार आहेत. तर, हॅरी आणि त्याची पत्नी मेगन 7 मार्चला ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंध का तोडले या मागचे कारण संपूर्ण जगाला सांगणार आहेत.

पुढे वाचा ...
लंडन 23 फेब्रुवारी : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) 7 मार्चला कॉमनवेल्थचा (Commonwealth) सोहळा साजरा करताना टीव्हीवर दिसणार आहेत. या दरम्यान त्या टीव्हीवर संदेशदेखील जारी करणार आहेत. त्याच दिवशी त्यांचा नातू हॅरीची ओपरा विनफ्रे यांनी घेतलेली वाददग्रस्त मुलाखतदेखील प्रसिद्ध होणार आहे. हॅरी आणि त्याची पत्नी मेगन 7 मार्चला त्यांनी ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंध का तोडले या मागचे कारण संपूर्ण जगाला सांगणार आहेत. 8 मार्चला ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ डे होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाऐवजी यावर्षी महाराणी एलिझाबेथ संदेश जारी करणार आहेत. हा कार्यक्रम कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे. महाराणी एलिझाबेथ यांचा हा वार्षिक कार्यक्रम वेस्टमिंस्टर एब्बे इथे दरवर्षी होत होता. दरम्यान, राजघराण्याकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली आहे की, 'या कार्यक्रमात हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स, मोठा भाऊ प्रिन्स विल्यम आणि अन्य शाही सदस्य सहभागी होणार आहेत.' हॅरी आणि मेगन यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन चॅट शो होस्ट ओप्राह विन्फ्रे यांना मुलाखत दिल्याचं जाहीर केलं होतं. हॅरी आणि मेगन यांचा 2018 मध्ये शाही विवाहसोहळा झाला. लग्नानंतर दोघांचे राजघराण्याशी कसे संबंध राहिले आहेत याबाबत ते मुलाखतीमध्ये सांगतील. त्याचसोबत या मुलाखतीमध्ये ते राजघराण्याबाबत अनेक तक्रारीदेखील करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनचं राजघराणं जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे संपूर्ण जगात या राजघराण्यासंबंधी जाणून घ्यायची उत्सुकता असते. राणी एलिझाबेथ तिची मुलं, नातवंडं या सगळ्यांच्या सार्वजनिक तसंच खासगी आयुष्याबद्दलही सामान्यांना उत्सुकता असते. त्यामुळे तशा बातम्या वाचण्या, ऐकण्यासाठी कायम तयार असतात. हॅरी आणि मेगन यांच्या मुलाखतीची घोषणा झाल्यानंतर बकिंगहॅम पॅलेसकडून सांगण्यात आले की, 'या जोडप्याने आपल्या शाही भूमिकांचा त्याग केला आहे. यामुळे राजेशाहीला धक्का बसला आहे.'  महाराणी एलिझाबेथने ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सला आदेश दिले आहेत की, 'आपल्या मानद पदव्यांचा त्याग केल्यानंतर संरक्षण देण्यासाठी राजघराण्यामध्ये परत येऊ नये.' हॅरी आणि मेगन मागच्या वर्षी अमेरिकेत राहायला निघून गेले. दोघांनी राजघराणं सोडून दिल्यानंतर ब्रिटिश मीडियाने याला 'मेक्झिट' असं नाव दिलं. दरम्यान, हॅरी आणि मेगन यांनी त्यांना दुसरं मूल होणार असल्याचं व्हॅलेंटाइन डेला जाहीर केलं होतं.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Prince harry

पुढील बातम्या