जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Coronavirus: ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची दहशत, WHO नं सांगितलं किती धोकादायक

Coronavirus: ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची दहशत, WHO नं सांगितलं किती धोकादायक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भारतात आतापर्यंत हजारो रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं जगभरातील केंद्र सरकारांनी (Central Government) सर्व यंत्रणेला आणि जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी: जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होत आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरियंटची दहशत सर्वत्र पसरत आहे. ओमायक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमायक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमायक्रॉनचा प्रसार भारतातदेखील झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत हजारो रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं जगभरातील केंद्र सरकारांनी (Central Government) सर्व यंत्रणेला आणि जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी निर्बंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनबाबत सुरू असलेल्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. यामुळं संशोधकांची चिंता आणखी वाढली आहे. ओमायक्रॉनचे व्हेरियंटचे, बीए.1 (BA), बीए.2 (BA.2) आणि बीए.3 (BA.3) असे तीन सब-लिनिएज (Sub-lineage) किंवा स्ट्रेन आहेत. आतापर्यंत BA.1 हा स्ट्रेन ब्रिटनमध्ये धुमाकूळ घालत होता. पण, आता ब्रिटनमध्ये BA.2 या स्ट्रेनचा शिरकाव झाल्याचं निदर्शनास आलं आहे. BA.2 स्ट्रेन हा ओमायक्रॉनचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. ब्रिटीश वृत्तपत्र डेली एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीनं (UKHSA) युकेमध्ये ओमायक्रॉनचे 53 सिक्वेन्स ओळखण्यात यश मिळवलं आहे. युकेएचएसएनं दिलेल्या माहितीनुसार, युकेमध्ये ओमायक्रॉनच्या BA.2 स्ट्रेनची (Strain) 53 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हेही वाचा-   IPL 2022 : CSK चा कॅप्टन या सिझनमध्येच बदलणार, 3 वेळा विजेतेपद पटकावणारा घेणार धोनीची जागा! BA.2 वेगानं पसरत असला तरी, त्याची लक्षणं फारशी गंभीर नाहीत. शिवाय ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याचा प्रसारही कमी आहे, असं युकेएचएसएनं स्पष्ट केलं आहे. BA.2 स्ट्रेनचे 53 सिक्वेन्स असून तो जास्त संक्रामणशील आहे. यात कोणतेही विशिष्ट म्युटेशन्स नाहीत, त्यामुळं तो डेल्टा व्हेरियंटपासून सहज वेगळा केला जाऊ शकतो. रिसर्च एजन्सीच्या म्हणण्यानुसार BA.2 स्ट्रेन जास्त धोकादायक आहे की नाही हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही. असं असलं तरी, हा स्ट्रेन (Strain) अधिक संसर्गजन्य आणि अधिक प्राणघातक असल्याची चर्चा ब्रिटनमध्ये सुरू आहे. ब्रिटनमध्ये निदर्शनास येण्या अगोदर काही दिवस इस्रायलमध्ये ओमायक्रॉनचा हा स्ट्रेन आढळला होता. द टाइम्स ऑफ इस्रायलच्या मते, तिथे BA.2 ची एकूण 20 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. अनेक देशांमध्ये आढळला आहे ओमिक्रॉनचा BA.2 स्ट्रेन एका रिपोर्टनुसार, BA.2 स्ट्रेन आतापर्यंत अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत आणि सिंगापूर येथे त्याचे रुग्ण आढळले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटचे एकूण तीन स्ट्रेन आढळले आहेत. यापैकी BA.1 आणि BA.3 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये 69 ते 70 डिलीशन आहेत, तर BA.2 मध्ये ते नाही. भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या जीनोमिक सिक्वेन्सिंगचा अभ्यास करण्याची जबाबदारी इंडियन सार्स कोव्ह 2 जीनोमिक कन्सोर्टियमची (INSACOG) या संस्थेकडं आहे. देशभरात त्याच्या 38 प्रयोगशाळा आहेत. इन्साकॉगच्या मते, ओमिक्रॉन व्हेरियंटचा (B.11.529) BA.1 ट्रेन देशात सध्या वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात तर त्यानं डेल्टाची जागा घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात