लंडन 15 एप्रिल: कोरोनाने सगळ्या जगात धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झालीय. कोरोना म्हणजे मृत्यूच असा सगळ्यांचा समज झाला. मात्र ब्रिटनमधल्या 106 वर्षांच्या आजीबाईंनी हा समज दूर केलाय. कोरोनावर मात करत त्या व्हायरसला हरवता येते हे त्यांनी दाखवून दिलंय. आजीबाईंच्या जबर इच्छाशक्तिने डॉक्टरही थक्क झाले आहेत. Reutersने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोन्नी टिटचेन असं त्या आजींच नाव आहे. त्या बर्मिंहम इथं राहतात. 1913मध्ये त्यांचा जन्म झाला. कोन्नी आज याही वयात तरतरीत आहेत. काही कामं त्या याही वयात स्वत:च करत असतात. मार्च महिन्यात त्यांना न्यूमोनिया झाला. नंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
नंतर त्यांच्यावर तिथल्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. जबर इच्छाशक्ती आणि जगण्यावर प्रचंड प्रेम असल्याने त्यांनी औषधोपचारांना प्रतिसाद दिला आणि त्या बऱ्याही झाल्या. त्यांचा प्रतिसाद पाहून डॉक्टरही थक्क झालेत. या वयात त्या या आजारातून उठू शकतील का? याविषयी त्यांच्या मनात शंका होती. मात्र आजींनी त्यांची शंका खोटी ठरवली.
मला आता माझ्या कुटुंबीयांना भेटायचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर
चीनच्या वुहान शहरापासून वेगानं संसर्ग होत गेलेला कोरोना व्हायरस आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दुप्पट वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 200 हून अधिक देशांमध्ये याचा मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त धोका युरोपीय देशांना असून आतापर्यंत या व्हायरसमुळे युरोपमध्ये 70 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात 1 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू या व्हायरसमुळे झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत 25 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे मृत्यू झालेला रुग्णांच्या संख्येतील अमेरिका पहिल्या क्रमांकवर आहे. नवीन आकडेवारीनुसार अमेरिकेत 24 तासांत 2,228 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ATMमधून पैसे नाही तर येणार तांदूळ, लॉकडाऊनमध्ये 'या' देशाने अशी केली सोय
फ्रान्समध्ये 762 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा आकडा 15, 729 वर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्याा माहितीनुसार जगभरात ह्या व्हायरसमुळे आतापर्यंत 1,23,783 लोकांचा मृत्यू झाला असून 19,68,943 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी 30 एप्रिलपर्यंत किंवा एक महिना लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.