मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोंबडीला न मारताच होणार चिकन निर्मिती; 'या' ठिकाणी विक्रीला मिळाली परवानगी

कोंबडीला न मारताच होणार चिकन निर्मिती; 'या' ठिकाणी विक्रीला मिळाली परवानगी

सिंगापूरमध्ये (Singapore) कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन (Lab Made Chicken) विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे

सिंगापूरमध्ये (Singapore) कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन (Lab Made Chicken) विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे

सिंगापूरमध्ये (Singapore) कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन (Lab Made Chicken) विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे

नवी दिल्ली 18 मे : मांसाहार करणाऱ्यांसाठी चिकन (Chicken) म्हणजे एक मेजवानी असते. मात्र, आता चिकन कोंबडी कापल्याशिवायच मिळायला लागलंय, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे. सिंगापूरमध्ये (Singapore) कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन (Lab Made Chicken) विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे. 'डीडब्ल्यू हिंदी'च्या हवाल्याने'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

प्रयोगशाळेत अजून जिवंत प्राण्यांची निर्मिती करणं माणसाला जमलेलं नाही. मात्र, प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती करणं, ते वाढवणं इथपर्यंत मानवाने मजल मारली आहे. त्यासाठी सर्वात आधी एका जिवंत प्राण्याच्या शरीरातल्या स्टेम सेल्स (Stem Cells)अर्थात मूळ पेशी घेतल्या जातात. त्यांना प्रयोगशाळेत अशा अनुकूल परिस्थितीत ठेवलं जातं, की त्या पेशींची नैसर्गिक स्वरूपात वाढ होऊ लागते. त्यातूनच मसल फायबर्स (Muscle Fibres) तयार होतात. एक बर्गर तयार करण्यासाठी कमीत कमी 20 हजार मसल फायबर्सची आवश्यकता असते. मसल फायबर्स विकसित होण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागतो.

प्रयोगशाळेत मांस तयार करण्याचा एक फायदा म्हणजे जनावरांना मारावं लागत नाही. 2019 च्या आकडेवारीनुसार,जगभरात 32.5 कोटी टन मांसाचं उत्पादन झालं. आगामी काळात यापैकी थोड्या मांसाचं उत्पादन जरी प्रयोगशाळेत झालं, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचं ठरू शकतं. कारण मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरं मारली जातात. ही जनावरं वाढवताना ग्रीन हाउस गॅसचं (Green House Gas) उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती झाली, तर हे प्रदूषण कमी होऊ शकेल.

2013 मध्ये पहिल्यांदा प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती झाली होती. तेव्हा त्यासाठी अडीच लाख युरोएवढा खर्च आला होता. म्हणजेच एका बर्गरच्या निर्मितीसाठी तब्बल दोन कोटी रुपये लागले होते. गेल्या सहा वर्षांत झालेल्या संशोधनानंतर आता या खर्चात खूप मोठी घट झाली आहे; मात्र तरीही अजूनही प्रयोगशाळेतलं मांस नेहमीच्या मांसाच्या तुलनेत महागच आहे. आजच्या घडीला प्रयोगशाळेतल्या मांसापासून केलेल्या एका बर्गरला 10 ते 12 युरो एवढा खर्च येतो.

गेली अनेक वर्षं यावर संशोधन (Research) सुरू असलं, तरीही किंमत खूप जास्त असल्यामुळे या संशोधनाचा अद्याप सामान्य नागरिकांना फायदा झालेला नाही. हे संशोधन प्रयोगशाळेपुरतंच मर्यादित राहिलं आहे. तरीही आता सिंगापूरने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाच्या विक्रीला परवानगी दिल्यामुळे या दिशेने आशेचा एक किरण जागृत झाला आहे.

लाखो लोकांचं पोट भरू शकेल, एवढ्या मांसाची निर्मिती एका स्टेम सेलपासून होऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. येत्या काळात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात जगभरात सगळीकडेच या प्रकारचं प्रयोगशाळा निर्मित मांस मिळू शकेल.

First published:

Tags: Chicken, Singapore