जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / जगात कितीही संकट येवो, 'या' जादुच्या बॉक्समध्ये जाताच तुम्ही पुर्णपणे सुरक्षित व्हाल!

जगात कितीही संकट येवो, 'या' जादुच्या बॉक्समध्ये जाताच तुम्ही पुर्णपणे सुरक्षित व्हाल!

जगात कितीही संकट येवो, 'या' जादुच्या बॉक्समध्ये जाताच तुम्ही पुर्णपणे सुरक्षित व्हाल!

अण्वस्त्रयुद्ध असो किंवा रेडिएशन, कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत संरक्षण करणारा मॅजिक बॉक्स

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 मार्च : रशिया-युक्रेन युद्धात (Russia - Ukraine War) अण्वस्त्रांच्या (Nuclear) वापराबाबत चर्चा सुरू होताच, अण्वस्त्र युद्धादरम्यान सुरक्षित कसं राहता येईल, याविषयीच्या पर्यायांची चाचपणी जगभरात सुरू झाली आहे. अण्वस्त्रांचा कोणताही दुष्परिणाम जाणवू नये, यासाठी नेमकं काय करता येईल याविषयी विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या बंकर्सपासून ते लक्झरी भूमिगत शहरांसोबतच आता संपूर्ण संरक्षणाचा दावा करणारा एक इनडोअर न्यूक्लिअर शेल्टर बॉक्स (Indoor Nuclear Shelter Box) बाजारात दाखल झाला आहे. यामुळे तुम्ही प्रत्येक संकटातून वाचू शकता, अशी हमीदेखील दिली जात आहे. जपानी कंपनी (Japanese Company) या अनोख्या बॉक्सची विक्री करत आहे. या बॉक्सचं वैशिष्ट्य म्हणजे तो लहान घरं किंवा अपार्टमेंटमध्ये इन्स्टॉल (Install) करता येतो. जगात कोणत्याही स्वरूपाची विनाशकारी स्थिती निर्माण झाली, तरी या बॉक्स असलेल्या व्यक्तींना कोणतीही हानी पोहोचणार नाही, असा दावा या कंपनीने केला आहे. शॉक, स्फोट, रेडिएशन अशा कोणत्याही गोष्टींचा यावर परिणाम होणार नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. या मॅजिक बॉक्सविषयी अधिक माहिती घेऊ या. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही मृत्यू WNIshelter नावाच्या जपानी कंपनीकडे कॉम्पॅक्ट शेल्टर डिझाइन करण्याचं विशेष कौशल्य आहे. नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) लक्षात घेऊन त्यांनी हे शेल्टर अर्थात निवारा डिझाइन केला आहे. हा मॅजिक बॉक्स (Magic Box) भूकंप, पूर, क्षेपणास्त्र हल्ला आणि रेडिएशनपासून संरक्षण करील, असा दावा करण्यात आला आहे. या बॉक्समध्ये स्वतःची अशी एअर फिल्टरेशन सिस्टीम (Air Filtration System) आहे. तसंच वेगवेगळ्या आकारात हा बॉक्स उपलब्ध असेल. एक ते सात व्यक्ती राहू शकतील अशा पद्धतीनं याचं डिझाइन करण्यात आलं आहे. या शेल्टरमध्ये राहण्याव्यतिरिक्त अन्य सुविधादेखील असतील. हे ही वाचा- Russia- Ukraine War: युक्रेनला मदतीची गरज, ऐनवेळी अमेरिकेनं फिरवली पाठ जाहिरातीचा अनोखा फंडा युक्रेनपासून ते उत्तर कोरियापर्यंतचं युद्ध लक्षात घेऊन कंपनी आपल्या शेल्टर बॉक्सचा प्रचार करत आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर लिहिलं आहे, की, `उत्तर कोरियाने नवीन झिकझॅक फ्लाइट सुपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे, जे अडवता येत नाही. न्यूक्लिअर शेल्टरच्या साह्याने आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचं रक्षण करा. ज्यांना युक्रेनची चिंता आहे, त्यानुसार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी काय करू शकता याचा विचार करा. शेल्टर बॉक्सवर स्फोट आणि शॉकचा कोणताही परिणाम होणार नाही. ते रेडिएशन (Radiation), तसंच जैविक आणि रासायनिक शस्त्रांपासून तुमचं संरक्षण करण्यास सक्षम आहे.`

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात