लंडन, 21 जुलै : भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) यानं स्वतःचं प्रत्यार्पण (extradition) टाळण्यासाठी आता एक नवा बहाणा (New reason) शोधून काढला आहे. आपली मानसिक अवस्था बरी नसून (Mental condition not stable) भारतीय तुरुंगात (Indian Jail) तर निराशेचा झटका येऊन आपण आत्महत्या (Suicide) करू शकतो, असा बहाणा त्यानं सुरु केला आहे. नीरव मोदीच्या वतीनं त्याच्या वकिलांनी ब्रिटनच्या कोर्टात हा दावा करत मोदीचं प्रत्यार्पण रोखण्याची विनंती केली.
काय आहे नवा बहाणा?
नीरव मोदीच्या आईने तो केवळ 8 वर्षांचा असताना आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच नीरव मोदीमध्ये ‘सुसायडल टेंडन्सिज’ दिसू लागल्या होत्या. भारतातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांच्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे नीरव मोदीलाही वेळेत मानसोपचार मिळू शकले नाहीत, असा दावा वकिलांनी केला आहे.
भारतीय तुरुंगांची अवस्था वाईट
भारतातील तुरुंगांची अवस्था वाईट असून तिथल्या अवस्थेमुळे नीरव मोदी निराशेच्या गर्तेत अडकून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ शकतो, असा तर्क मोदीच्या वकिलांनी ब्रिटनच्या न्यायालयात मांडला आहे. भारतीय तुरुंगांमध्ये मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा वाईट दर्जाच्या असून तुरुंगांची अवस्थादेखील भीषण असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
हे वाचा -शिल्पा शेट्टी पॉर्न प्रकरणात सामिल? या मॉडेलकडे मागितला होता न्यूड व्हिडीओ
मानसोपचार कसे मिळणार?
भारतातील तुरुंगात मानसोपचार घेणं शक्य आहे, असा दावा जेव्हा भारताच्या वतीनं केला गेला, तेव्हा तुरुंगात मानसोपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचं मोदीच्या वकिलांनी म्हटलं. न्यायाधीशांच्या इच्छेवर याबाबतचे निर्णय होत असून मानसिक उपचारांअभावी एकानं मृत्युला कवटाळल्याचा दावा वकिलांनी केला. भारतात सध्या कोरोना असून तुरुंगात मानसोपचार तज्ज्ञ येत नाहीत. आले तरी प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला हवा तेवढा वेळ ते देऊ शकत नाहीत, असा दावा नीरव मोदीच्या वकिलांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirav modi, Nirav modi extraction, Suicide