जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

या महिला पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेत लॉकडाऊनचे नियम कडक केले, आणि करुन दाखवलं

  • -MIN READ
  • Last Updated :

वेलिंगटन, 9 ऑगस्ट : संपूर्ण जग कोरोना वायरस (Coronavirus) या महासाथीशी लढा देत आहे. या व्हायरसशी लढताना लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अशातच न्यूजीलँड एक आदर्श होऊन समोर आला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये कडक नियम आखत कोरोनाला नियंत्रणात आणलं. त्यामुळे या लेडी पंतप्रधानांचं जगभरात खूप कौतुक केलं जात आहे. येथे गेल्या 100 दिवसात एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. न्यूजीलँडमध्ये (New Zealand) मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन अत्यंत कडक केला होता. यातून संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यावेळी देशात केवळ 100 जणांना संसर्ग झाला होता. देशात रविवारी संक्रमणाची एकही नोंद आलेली नाही. गेल्या 100 दिवसात एकही रुग्ण संक्रमित झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात या देशात कमी जणांना लागण झाली असून यातही आंतरराष्ट्रीय प्रवास  करणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना परदेशातून परतताना सीमेवरच क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे. हे वाचा- ऑगस्टमध्ये भारतात सर्वात जास्त नवे कोरोना रुग्ण; ब्राझील, अमेरिकेलाही टाकलं मागे ‘यूनिवर्सिटी ऑफ ओटागो’ मध्ये महासाथीचे तज्ज्ञ प्रोफेसर माइकल बेकर यांनी सांगितले, हे चांगल्या राजकीय नेतृत्व व विज्ञानाच्या योग्य वापरामुळे शक्य झाले. जर तुम्ही ज्या देशांनी कोरोनाला नियंत्रणात आणलं त्यांचा विचार कराल तर या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. न्यूजीलँडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. लॉकडाउनमध्ये त्या जनतेला दररोजच्या परिस्थितीची माहिती देत होत्या. आणि कडक नियम लागू केले होते. या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1500 इतकी आहे. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात