चिंता वाढली! ऑगस्टमध्ये भारतात सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ब्राझील, अमेरिकेलाही टाकलं मागे
ऑगस्टच्या पहिल्या 8 दिवसातील भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.
|
1/ 11
सध्या जगात सर्वाधिक जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ऑगस्टमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार आता भारताची चिंता वाढली आहे.
2/ 11
भारतातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा दर वाढतो आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या 8 दिवसात जगातील सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद भारतात झाली आहे.
3/ 11
भारतात 8 दिवसात एकूण 4.55 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. म्हणजं दररोज सरासरी जवळपास 54 हजार कोरोना रुग्ण सापडले.
4/ 11
31 जुलैला कोरोनाचे एकूण 16.97 लाख रुग्ण होते, 8 ऑगस्टपर्यंत ही संख्या 21.52 लाख झाली. एक ऑगस्टला देशात जवळपास 54 हजार नवीन कोरोना प्रकरणं होती. 8 ऑगस्टला ती 65 हजार पार झाली आणि हा वेग खूपच भयंकर आहे.
5/ 11
जगातील कोरोनाव्हायरसच्या 50% पेक्षा जास्त प्रकरणं फक्त भारत, ब्राझील आणि अमेरिका या तीन देशांमध्येच आहेत. या तुन्ही देशांतील ऑगस्टच्या 8 दिवसांतील नवीन प्रकरणं पाहिली तर भारतात 4.55 लाख, ब्राझीलमध्ये 3.47 लाख आणि अमेरिकेत 4.42 लाख प्रकरणं आहे.
6/ 11
जगाची आकडेवारी पाहता ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. एक ऑगस्टला 1.77 कोटी रुग्ण होते. 8 ऑगस्टला ही संख्या 1.97 कोटी झाली आहे. म्हणजे जवळपास 2 कोटीपर्यंत पोहोचली.
7/ 11
जगातील एकूण प्रकरणांपैकी 11% प्रकरणं भारतात आहेत. मात्र ऑगस्टमधील नव्या प्रकरणांचा विचार केला तर भारतात सर्वात जास्त म्हणजे 25 टक्क्यांपेक्षाही जास्त प्रकरणं आहेत.
8/ 11
याचा अर्थ एकूण सर्वाधिक प्रकरणांमध्ये अद्याप तरी भारत तिसऱ्या प्रकरणांवर असला तरी नव्या प्रकरणांबाबतीत भारत ऑगस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
9/ 11
हा वेग असाच कायम राहिला तर भारत कदाचित ब्राझीलला मागे टाकून जगातील दुसरा सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश बनण्याची शक्यता आहे.
10/ 11
भारत आणि ब्राझीलची तुलना करता 31 जुलैला ब्राझीलमध्ये 26.66 लाख आणि भारतात 16.97 लाख प्रकरणं होती. या दोन्ही देशांमध्ये 9.70 लाख प्रकरणांचा फरक होता आणि 8 ऑगस्टला हा फरक फक्त 8.61 लाख प्रकरणं इतकाच राहिला आहे.
11/ 11
म्हणजे एका आठवड्यात एक लाख प्रकरणांचं अंतर कमी झालं आहे. जर दोन्ही देशांमधील वेग असाच राहिला तर 8 आठवड्यात भारत ब्राझीललाही मागे टाकेल आणि भारतातील रुग्णवाढीचा वेग वाढला तर मग 8 आठवड्यांच्याआधीच भारत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.