Home /News /videsh /

आनंदवार्ता! इंग्लिश शाही घराण्यात लवकरच येणार आणखी एक नवा पाहुणा

आनंदवार्ता! इंग्लिश शाही घराण्यात लवकरच येणार आणखी एक नवा पाहुणा

Duke and Duchess of Sussex अर्थात 36 वर्षीय प्रिन्स हॅरी आणि 39 वर्षीय मेघन यांच्या अधिकृत प्रवक्त्यानं Good News ला दुजोरा दिला आहे.

    लंडन, 15 फेब्रुवारी : जगभरातलं इंटरनेट रविवारी रात्री इंटरनेट ओसंडून वाहत होतं, ते मेघन मार्केल (Meghan Markel) आणि प्रिन्स हॅरी (Prince Harry) यांच्याविषयीच्या बातम्यांनी. मेघन आणि हॅरी हे ब्रिटनच्या शाही घराण्यातलं जोडपं (royal couple from British royal family). या ग्लॅमरस जोडप्याने एक गुड न्यूज दिली आहे. हे दोघे आपल्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहेत (Harry-Meghan expecting their second child). मेघनचा मित्र मिसान हॅरीमन (Misan Harriman) यानं एक सुंदर फोटो शेअर केला. त्यानं लिहिलं, 'प्रिय मैत्रिणी, तुम्हा दोघांची प्रेमकहाणी सुरू होताना पाहण्यासाठी मी लग्नाला उपस्थित होतो. आता ती बहरताना पाहणंही माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. या खास बातमीसाठी ससेक्सच्या ड्यूक आणि डचेसचं (Duke and Duchess of Sussex) अभिनंदन!' 36 वर्षीय प्रिन्स हॅरी आणि 39 वर्षीय मेघन यांच्या अधिकृत प्रवक्त्यानं सांगितलं, की आम्ही या वृत्ताला दुजोरा देतो, की आर्ची (Archie) आता मोठा भाऊ होणार आहे. ससेक्सचे ड्यूक आणि डचेस आपलं दुसरं बाळ लवकरच येणार असल्यानं अत्यंत आनंदात आहेत. बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्यानं सांगितलं, की केवळ Duke and duchess of Sussex  नाही तर सगळं शाही कुटुंब आणि राजवाडा दोघांच्या आनंदात सहभागी आहे. सगळं सुरळीत पार पडावं यासाठी हरेकजण प्रार्थना करतो आहे. हेही वाचासिनेटकडून दिलासा मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्केल यांनी मे 2018 मध्ये विंडसर कॅसल (Windsor castle) इथं लग्न केलं. एका वर्षानंतर त्यांच्या मुलाचा, अ‍ॅर्चीचा जन्म झाला. जुलै 2016 मध्ये हॅरी आणि मेघन ब्लाइंड डेटवर (blind date) गेले होते. नंतर हॅरीला विचारलं गेलं, की मेघन हीच तुझी जीवनसाथी असणार हे तू केव्हा ठरवलंस? तेव्हा त्यानं उत्तर दिलं, की तिला मी पहिल्यांदा पाहिलं आणि भेटलो अगदी तेव्हाच. नोव्हेंबर, 2016 मध्ये हॅरीनं दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. याशिवाय माध्यमांसह सोशल मीडियावरच्या ट्रोल्सनाही त्यानं सांगितलं, की माझ्या गर्लफ्रेंडविरुद्ध चाललेली बदनामी आणि छळ लगोलग थांबवा.  आता या शाही जोडप्याच्या असंख्य चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती बाळाला पाहण्याची.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Prince harry

    पुढील बातम्या