Home /News /videsh /

Donald Trump Impeachment: सिनेटकडून दिलासा मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Donald Trump Impeachment: सिनेटकडून दिलासा मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प यांची दुसऱ्यांदा महाभियोगाच्या (Impeachment) खटल्यातून मुक्तता झाली आहे.

    वॉशिंग्टन, 14 फेब्रुवारी : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  कॅपिटॉल हिल (US Capitol Attack) मध्ये हिंसाचार आणि दंगल भडकवल्याच्या आरोपातून सिनेटनं त्यांची मुक्तता केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची दुसऱ्यांदा महाभियोगाच्या (Impeachment) खटल्यातून मुक्तता झाली आहे. अमेरिकेच्या आजी किंवा माजी अध्यक्षांवर दुसऱ्यांदा महाभियोगाचा खटला चालवण्याची ही पहिलीच घटना होती. काय म्हणाले ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आपलं राजकीय आंदोलन आत्ताच सुरु झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाभियोगाच्या प्रकरणात सिनेटमध्ये झालेल्या मतदानानंतर ट्रम्प यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन. आपल्यासाठी ऐतिहासिक, देशभक्तीचं आणि सुंदर आंदोलन आता सुरु झालं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये माझ्याकडे तुमच्यासोबत शेयर करण्यासारखं खूप आहे. आपण अमेरिकेला महान बनवण्याच्या प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहोत. आपल्यापुढे अनेक कामं आहेत. लवकरच एका उज्ज्वल अमेरिकेच्या भविष्यासाठी कामाला लागूया.'' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या लीगल टीमलाही धन्यवाद दिले. अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षावर ही परिस्थिती यापूर्वी ओढावली नव्हती, अशी आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. ( वाचा : माजी सरन्यायाधीशच म्हणतात, ‘मी कोर्टात जाणार नाही, तिथं न्याय मिळत नाही’ ) 10 मतांमुळे वाचले ट्रम्प! अमेरिकन सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यासाठी ठरावाच्या बाजूनं 67 मत पडण्याची आवश्यकता होती. 57 सदस्यांनी ते दोषी असल्याच्या बाजूनं मतदान केलं. तर 43 सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे 10 मतांमुळे त्यांच्यावरील महाभियोग टळला आहे. सिनेटच्या निर्णयाकडे ट्रम्प यांचा विजय म्हणून पाहिले जात आहे. आता ट्रम्प यांची इच्छा असेल, तर ते 2024 साली होणारी अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. या महाभियोग प्रकरणी 4 दिवस सुनावणी करण्यात आली आणि त्यानंतर पाचव्या दिवशी याबाबत मतदान घेण्यात आले. याआधी त्यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. त्यांनी सिनेटमध्ये असे म्हटले होते रिपब्लिकन नेत्याविरूद्ध देशद्रोहाचा भडका उडविण्याचे आरोप हे 'साफ खोटे' आहेत आणि त्यांच्याविरूद्ध महाभियोगाची कारवाई 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Donald Trump, United States of America, US President

    पुढील बातम्या