• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अनागोंदी! हॉस्पिटलमधून बाळाची चोरी, अर्भकाच्या जागी ठेवली प्लॅस्टिकची बाहुली

अनागोंदी! हॉस्पिटलमधून बाळाची चोरी, अर्भकाच्या जागी ठेवली प्लॅस्टिकची बाहुली

हॉस्पिटलमध्ये नुकत्याच (Newborn baby stolen and replaced with plastic doll) जन्माला आलेल्या बाळाला पळवून नेत त्याच्या जागी प्लॅस्टिकची बाहुली ठेवल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आहे.

 • Share this:
  लाहौर, 5 नोव्हेंबर: हॉस्पिटलमध्ये नुकत्याच (Newborn baby stolen and replaced with plastic doll) जन्माला आलेल्या बाळाला पळवून नेत त्याच्या जागी प्लॅस्टिकची बाहुली ठेवल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आहे. भारताचा शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानमध्ये हा (Shocking incidence in Pakistan) धक्कादायक प्रकार घडला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर भूल न उतरलेल्या आईच्या शेजारी पाळण्यात हे मूल ठेवण्यात आलं होतं. जेव्हा आई शुद्धीत आली आणि तिने आपल्या बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला प्लॅस्टिकची बाहुली उचलून दिली. आईला जबर धक्का पाकिस्तानच्या रावळपिंडीत एक महिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ज्या बाळाचा नऊ महिने पोटात सांभाळ केला, ते आता प्रत्यक्ष दिसणार असल्याची उत्कंठा मनात घेऊन तिचं ऑपरेशन झालं. यशस्वी पार पडलेल्या ऑपरशेनवेळी दिलेली भूल असल्यामुळे ग्लानीत असणाऱ्या आईला झोप लागली होती. काही वेळानंतर ती जागी झाली आणि तिनं सर्वप्रथम आपल्या बाळाला जवळ देण्याची मागणी केली. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही धक्का काही वेळापूर्वीच स्वतःच्या हाताने पाळण्यात ठेवलेलं बाळ गायब झाल्याचं पाहून कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. या महिलेनं जेव्हा आपलं बाळ मागितलं, तेव्हा पाळण्यात प्लॅस्टिकची बाहुली असल्याचं कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी तत्काळ हॉस्पिटल प्रशासनाला याची सूचना दिली. हॉस्पिटलनं पोलिसांना संपर्क साधत घटनेची कल्पना दिली. रुग्ण झाले आक्रमक काहीही करून महिलेला तिचं बाळ परत मिळावं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारनं घ्यावी, या मागणीसाठी रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये आंदोलन केलं. आक्रमक रुग्णांना शांत करता करता पोलिसांच्या नाकी नऊ आले. हे वाचा- 17वर्षीय मुलीवर 17 जणांकडून गँगरेप; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार पोलीस तपास सुरू पोलिसांनी हॉस्पिटल आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल आणि आईला बाळ परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
  Published by:desk news
  First published: