मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

9 वर्षांपासून उपचार करणारा डॉक्टर निघाला खरा 'बाप'; मायलेक दोघीही हादरल्या

9 वर्षांपासून उपचार करणारा डॉक्टर निघाला खरा 'बाप'; मायलेक दोघीही हादरल्या

तब्बल 35 वर्षांनंतर याचा खुलासा झाला.

तब्बल 35 वर्षांनंतर याचा खुलासा झाला.

तब्बल 35 वर्षांनंतर याचा खुलासा झाला.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : इंटरनेटवर तशा अनेक बातम्या व्हायरल होतात, जे वाचून कोणीही हैराण होईल. (Shocking News) ज्या बातमीबद्दल सांगितलं जात आहे, ती बातमी वाचून इतर लोक तर हैराण झालेच. मात्र त्या महिलेलाही धक्का बसला. एका महिलेला अचानक कळालं की तिचे खरे वडील (Biological Father) एक स्त्री रोग चिकित्सक (gynaecologist) आहे. ज्याच्यांकडून ती गेल्या 9 वर्षांपासून उपचार करवून घेत आहे. महिलेला जेव्हा याबाबत कळालं तर तिच्या पायाखालची जमिन सरकली.

ही संपूर्ण घटना अमेरिकेतील (USA) न्यूयॉर्क (New York) शहरातील आहे. जेव्हा एका डीएनए रिपोर्टमधून 35 वर्षीय मॉर्गन हेलक्विस्टला (Morgan Hellquist) कळालं की, ती ज्या gynaecologist कडे गेल्या 9 वर्षांपासून उपचार घेत आहे, तेच तिचे वडील आहेत. यानंतर मॉर्गनला धक्का बसला. ती पुढे म्हणाली की, गेल्या अनेक वर्षांपासून ती न्यूयॉर्कमधील सेंटर ऑफ मेंस्रुअल डिसऑर्ड ( The Center of Menstrual Disorders) मध्ये काम करणारे मॉरिस वॉर्टमॅन (Morris Wortman) नावाच्या डॉक्टरकडून (Doctor) उपचार करून घेत आहे. या डॉक्टरच वय 70 वर्षे आहे.

हे ही वाचा-भयंकर! एअरपोर्टच्या बाथरूममध्येच प्रसुती; तोंडात टॉयलेट पेपर कोंबुन बाळाची हत्या

1985 मध्ये जन्मलेल्या मॉर्गनला 1993 मध्ये याबाबत कळालं. तिच्या आईने कृत्रिम गर्भधारणा केली (Artifical Conception) होती. 1980 च्या सुरुवातील तिच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. ज्यानंतर त्याच्या कमरेखालील भाग पॅरलाइज झाला होता. तेव्हा मॉर्गनच्या आई-वडिलांनी डॉक्टर मॉरिस वॉर्टमेनशी संपर्क केला. त्यांनी कृत्रिम गर्भधारणेच्या (artificial impregnation) प्रक्रियेतून मॉरिसच्या आईने गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण झाली. त्यावेळी डॉक्टरने कुटुंबीयांला सांगितलं की, या प्रोसेसमध्ये वापर केलेला स्पर्म एका मेडिकल स्टुडंटचा आहे. मात्र जेव्हा डीएनए रिपोर्ट समोर आला तेव्हा मॉर्गनला धक्का बसला.

मॉर्गनने डॉक्टरवर आरोप केला आहे की, त्याने माझ्या आई-वडिलांकडून ही बाब लपवली. गर्भधारणेसाठी वापरले गेलेले स्पर्म डॉक्टरांचे होते. मॉर्गन कोणाची मुलगी आहे, हे माहिती असतानाही ते तिच्यावर उपचार करीत होते. मॉर्गन पुढे म्हणाली की, जर तिला वडिलांबद्दल कळालं असतं तर तिने (Women Related Health Issues) या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले नसते. या दरम्यान मॉरिसने त्यांच्या प्राइवेट अवयवांचं अल्ट्रासाउंड केलं आणि चेकअपदेखील केला. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर आता मॉर्गन, मॉरिसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Health, Pregnent women, Resident Doctors