मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘कसौटी जिंदगी..’ मालिकेतील मुख्य अभिनेत्यालाही कोरोना; मुंबईतील शूटिंग थांबवलं

‘कसौटी जिंदगी..’ मालिकेतील मुख्य अभिनेत्यालाही कोरोना; मुंबईतील शूटिंग थांबवलं

मुंबईतील एका स्टुडिओमध्ये या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले होते. यातील मुख्य भूमिका साकारणारा पार्थ पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेकडून सर्वांची तपासणी केली जात आहे

    मुंबई, 12 जुलै : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये कोरोनाची प्रकरणं समोर येत आहे. काल महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आज सकाळी आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या दोघीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. बालाजी प्रॉडक्शन कसौटी जिंदगी की 2 मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. शोमध्ये तो अनुरागची भूमिका साकारत आहे. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार क्लिक निक्सोन स्टुडिओतील शूटिंग थांबविण्यात आले आहे. आणि शो स्टार कास्ट आणि क्रू यांना वेळापत्रकानुसार बीएमसीकडे येण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनासाठी सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. हे वाचा-#BREAKING : ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह क्लिक निक्सोन स्टुडिओमध्ये बालाजी प्रोडक्शनअंतर्गत कसौटी जिंदगी की, कुमकुम भाग्य, पवित्र भाग्य यांची शूटिंग सुरू होतं. आणि कसौटी जिंदगी की शो स्टार कास्ट आणि इतरांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्या राय आणि आराध्या यांची सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जया बच्चन आणि त्यांच्या मुलीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र त्याचे चारही बंगल्यांना सॅनिटाइझ करण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: TV serials

    पुढील बातम्या