मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Corona ने बदलली सौंदर्याची परिभाषा, Mask लावलेले पुरुष महिलांना वाटतायत appealing

Corona ने बदलली सौंदर्याची परिभाषा, Mask लावलेले पुरुष महिलांना वाटतायत appealing

कोरोनाने जशा अनेक गोष्टी बदलल्या, तशाच अनेक व्याख्याही बदलल्या. त्यातलीच एक व्याख्या आहे सौंदर्याची. वाचा, काय सांगतं नवं संशोधन.

कोरोनाने जशा अनेक गोष्टी बदलल्या, तशाच अनेक व्याख्याही बदलल्या. त्यातलीच एक व्याख्या आहे सौंदर्याची. वाचा, काय सांगतं नवं संशोधन.

कोरोनाने जशा अनेक गोष्टी बदलल्या, तशाच अनेक व्याख्याही बदलल्या. त्यातलीच एक व्याख्या आहे सौंदर्याची. वाचा, काय सांगतं नवं संशोधन.

न्यूयॉर्क, 14 जानेवारी: कोरोनाने (Corona) जसं जग (world) बदललं, तशीच जगातील अनेकांची सौंदर्याची परिभाषा (Definition of beauty) आणि अभिरूचीदेखील (Taste) बदलली. कोरोनाचा शिरकाव झाला त्या काळात मास्क (Mask) हा सर्वांसाठी एक बंधन आणि सक्तीचा भाग होता. मात्र दोन वर्षानंतर आता हा मास्क असा काही रुळला आहे, की तो केवळ आरोग्याची गरज न उरता सौंदर्याची नवी परिभाषा तयार करू पाहत आहे. नुकत्याच झालेल्या नव्या प्रयोगानुसार महिलांना मास्क लावलेले पुरुष हे मास्क न लावलेल्या पुरुषांपेक्षा अधिक आकर्षक वाटत असल्याचं दिसून आलं आहे. 

असं आहे संशोधन

शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात एकूण 43 महिलांवर प्रयोग करण्यात आला. या महिलांना वेगवेगळ्या पुरुषांचे चेहरे दाखवण्यात आले आणि त्याला 1 ते 10 पैकी गुण देण्यास सांगण्यात आलं. यामध्ये तीन प्रकारच्या चेहऱ्यांचा समावेश होता. त्यातील एक चेहरा होता सर्जिकल मास्क लावलेला, दुसरा चेहरा होता मास्क न लावलेला आणि तिसरा चेहरा होता चेहऱ्याचा खालचा अर्धा भाग पुस्तकाने झाकलेला. एकाच पुरुषाचे तिन्ही प्रकारचे चेहरे महिलांसमोर सादर करण्यात आले आणि त्याला गुण देण्यास सांगण्यात आलं. 

असे मिळाले गुण

महिलांनी सर्वाधिक गुण हे सर्जिकल मास्क लावलेल्या चेहऱ्याला दिले. त्याखालोखाल मास्क नसलेल्या चेहऱ्याला तर सर्वात कमी गुण समोर पुस्तक धरलेल्या चेहऱ्याला मिळाले. असाच प्रयोग पुरुषांच्या बाबतीतही केला गेला आणि त्यांना महिलांचे अशाच तऱ्हेनं तीन प्रकारचे चेहरे दाखवण्यात आले. मात्र या प्रयोगाचे निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. 

हे वाचा -

अशी आहे मानसिकता

निसर्गतः मानवाचा कल हा स्वतःचं संरक्षण करण्याकडे असतो. त्याचप्रमाणं जोडीदाराची निवड करताना जो आपल्याला अधिकाधिक सुरक्षित वाटेल, त्याची निवड केली जाते. या नैसर्गिक प्रेरणेनुसार महिलांनी मास्क लावलेल्या पुरुषांची निवड केल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. मास्क हा सुरक्षेचा नवा मंत्र झाला असून मास्क लावलेले पुरुष हे महिलांना अधिक जबाबदार वाटत असल्यामुळे त्या फोटोंना अधिक गुण मिळाल्याचं सांगितलं जात आहे. 

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Face Mask, Mask, Research