मराठी बातम्या /बातम्या /विदेश /आईवडिल घोरत होते, बाळ गुदमरत होतं! नवजात बालकाच्या दुर्दैवी मृत्यूची करूण कहाणी

आईवडिल घोरत होते, बाळ गुदमरत होतं! नवजात बालकाच्या दुर्दैवी मृत्यूची करूण कहाणी

आई आणि वडील इतके गाढ झोपले होते की त्यांना (New born baby dies suffocating under fathers arm) आपल्याकडून बाळाबाबत काय चूक होत आहे, हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता.

आई आणि वडील इतके गाढ झोपले होते की त्यांना (New born baby dies suffocating under fathers arm) आपल्याकडून बाळाबाबत काय चूक होत आहे, हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता.

आई आणि वडील इतके गाढ झोपले होते की त्यांना (New born baby dies suffocating under fathers arm) आपल्याकडून बाळाबाबत काय चूक होत आहे, हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता.

लंडन, 3 ऑक्टोबर : नवजात बाळाला किती आणि कसं जपावं लागतं, हे (New born baby dies suffocating under fathers arm) सर्वांनाच माहित आहे. बाळाला सांभाळताना झालेली एक चूकदेखील महागात पडू शकते. बाळाला काहीच समजत नसल्यामुळे त्याचा सांभाळ करणाऱ्या आईवडिलांना सतत सावध राहून बाळाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. थोडासा हलगर्जीपणादेखील बाळाच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. नुकतंच याचं एक उदाहरण समोर आलं आहे.

बाळ झोपलं बेडवर

ब्रिटनमधील कॉर्नवॉल भागात राहणाऱ्या एका दांपत्याला एक मुलगी झाली होती. हॉस्पिटलमधून घरी आलेल्या नवजात बालकाचं घरच्यांनी जोरदार स्वागत केलं. तिच्यासाठी अनेकानेक खेळणी आणली आणि एक पाळणादेखील आणला. दररोज रात्री स्तनपान झाल्यानंतर बाळाला पाळण्यात झोपवण्यात येत होतं. जेव्हा जेव्हा बाळ रडत उठायचं, तेव्हा तेव्हा त्याचे वडील बाळाला उचलून आईकडे द्यायचे. मग पुन्हा आईचं दूध पिऊन बाळ पाळण्यात शांतपणे झोपी जायचं. मात्र काही दिवसच हा सिलसिला सुरू राहिला. एक दिवस यात खंड पडला आणि वडिलांची दिरंगाई बाळाच्या जीवावार बेतली.

बेडवरच राहिलं बाळ

नेहमीप्रमाणे स्तनपान झाल्यानंतर बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी वडिलांनी आपल्याजवळ तिला झोपवलं. आई आणि वडील दोघंही दिवसभर कमालीचे थकले होते. त्यामुळे काही क्षणात दोघांनाही गाढ झोप लागली. बाळाला पाळण्यात ठेवायचं विसरून वडील गाढ झोपी गेले. झोपेत वडिलांचा उजवा हात बाळाच्या नाकावर पडला. त्यामुळे बाळ गुदमरलं. त्या 18 दिवसांच्या कोवळ्या जिवाला स्वतःची सुटकाही करून घेणं शक्य नव्हतं. वडील मात्र इतके गाढ झोपले होते की त्यांना आपल्याकडून काय चूक होत आहे, हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता.

हे वाचा - नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी

बाळाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळी जाग आल्यानंतर वडिलांना मोठा धक्का बसला. बाळ त्यांच्या उजव्या हाताखाली गुदमरलं होतं आणि बेशुद्ध पडलं होतं. दोघांनीही तातडीनं बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे दांपत्याला जबर धक्का बसला असून या चुकीमुळे आपण कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, असं वडिलांनी म्हटलं आहे. एका किरकोळ चुकीमुळे चिमुकल्या बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे.

First published:

Tags: Baby died, Father, London, Mother