जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

माउंट एव्हरेस्टसह 4 पर्वतांवरून 34 टन कचरा जमा करण्यात आला. नेपाळ लष्कराने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवरून सुमारे 34 टन कचरा गोळा करण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे अभियान आयोजित केलं होतं. (सर्व फोटो -AP)

01
News18 Lokmat

नेपाळ लष्कराच्या नेतृत्वाखालील पथकाने 'सफा हिमाल अभियान 2022' दरम्यान 33.8 टन कचरा गोळा केला. या मोहिमेची सुरुवात 5 एप्रिल रोजी करण्यात आली. 2019 मध्ये सुरू झालेली ही मोहीम 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आली होती. यंदा साचलेला कचरा सर्वाधिक आहे. इथे एका निवेदनात लष्करानं सांगितलं की, 2019 मध्ये सुमारे 10 टन आणि गेल्या वर्षी 27 टनांहून अधिक कचऱ्याचं संकलन झालं होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'सफा हिमाल अभियान 2022' ची सांगता झाली. नेपाळ आर्मी आणि शेर्पांच्या संयुक्त पथकाने माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांचनजंगा आणि मनास्लू येथून 33,877 किलो कचरा गोळा केला.

जाहिरात
03
News18 Lokmat

30 लष्करी जवान आणि 48 शेर्पा यांचं पथक स्वच्छता मोहिमेत गुंतलं होतं. या टीममध्ये चार डॉक्टरांचाही समावेश होता. या पथकाने रविवारी मोहिमेच्या शेवटी नेपाळचे लष्करप्रमुख प्रभू राम शर्मा यांच्याकडे ध्वज सुपूर्द केला. लष्करप्रमुख शर्मा म्हणाले की, पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे सर्वांवर कठीण परिस्थिती ओढवणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं हे मानवाचं सर्वोच्च कर्तव्य आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

निवेदनात म्हटलं आहे की, डोंगरातून दोन प्रकारचा कचरा (सेंद्रिय आणि असेंद्रिय) गोळा करण्यात आला. या कचऱ्याचं स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्यात आलं आहे आणि अजूनही काही कचऱ्याचे व्यवस्थापन केलं जात आहे. टीमला एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर सर करण्यासाठी 55 दिवस आणि कांचनजंगा आणि मनास्लू येथे अनुक्रमे 44 आणि 43 दिवस लागले, असं निवेदनात म्हटलं आहे. मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात कांचनजंगा येथे दोन मानवी सांगाडेही सापडले.

जाहिरात
05
News18 Lokmat

"जैवविघटनशील कचरा संबंधित स्थानिक सरकारांना सुपूर्द करण्यात आला तर जैवविघटन न होणारा कचरा विविध संस्थांना पुनर्वापरासाठी देण्यात आला," असं लष्करानं सांगितलं. काही कचरा अद्याप सुपूर्द करणं बाकी आहे. "पर्यटन विभागाचे महासंचालक तारानाथ अधिकारी म्हणाले की, पर्वतांचं संरक्षण आणि स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र बटालियन किंवा कंपनीची गरज आहे," असं वृत्त माय रिपब्लिका या वृत्तपत्रानं दिलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

    नेपाळ लष्कराच्या नेतृत्वाखालील पथकाने 'सफा हिमाल अभियान 2022' दरम्यान 33.8 टन कचरा गोळा केला. या मोहिमेची सुरुवात 5 एप्रिल रोजी करण्यात आली. 2019 मध्ये सुरू झालेली ही मोहीम 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आली होती. यंदा साचलेला कचरा सर्वाधिक आहे. इथे एका निवेदनात लष्करानं सांगितलं की, 2019 मध्ये सुमारे 10 टन आणि गेल्या वर्षी 27 टनांहून अधिक कचऱ्याचं संकलन झालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

    रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'सफा हिमाल अभियान 2022' ची सांगता झाली. नेपाळ आर्मी आणि शेर्पांच्या संयुक्त पथकाने माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांचनजंगा आणि मनास्लू येथून 33,877 किलो कचरा गोळा केला.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

    30 लष्करी जवान आणि 48 शेर्पा यांचं पथक स्वच्छता मोहिमेत गुंतलं होतं. या टीममध्ये चार डॉक्टरांचाही समावेश होता. या पथकाने रविवारी मोहिमेच्या शेवटी नेपाळचे लष्करप्रमुख प्रभू राम शर्मा यांच्याकडे ध्वज सुपूर्द केला. लष्करप्रमुख शर्मा म्हणाले की, पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे सर्वांवर कठीण परिस्थिती ओढवणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं हे मानवाचं सर्वोच्च कर्तव्य आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    नवे विक्रम रचण्यासाठी सर्वांनाच माऊंट एव्हरेस्ट हवा, पण कचऱ्याच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डचं काय?

    निवेदनात म्हटलं आहे की, डोंगरातून दोन प्रकारचा कचरा (सेंद्रिय आणि असेंद्रिय) गोळा करण्यात आला. या कचऱ्याचं स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्यात आलं आहे आणि अजूनही काही कचऱ्याचे व्यवस्थापन केलं जात आहे. टीमला एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर सर करण्यासाठी 55 दिवस आणि कांचनजंगा आणि मनास्लू येथे अनुक्रमे 44 आणि 43 दिवस लागले, असं निवेदनात म्हटलं आहे. मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात कांचनजंगा येथे दोन मानवी सांगाडेही सापडले.

    MORE
    GALLERIES

  • 05 05