Home /News /videsh /

आज रात्री ताजमहाला एवढा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत करणार प्रवेश; NASA च्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा

आज रात्री ताजमहाला एवढा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत करणार प्रवेश; NASA च्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा

हा लघुग्रह ताशी 50 हजार मैल अर्थात ताशी 80 हजार किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने (American Space Agency) दिलेल्या इशाऱ्यानुसार, मोठ्या आकाराचा एक लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असून, आज रात्री हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. हा लघुग्रह लंडनच्या जगप्रसिद्ध बिग बेन टॉवरएवढा विशाल असून, या लघुग्रहाची रुंदी आग्र्याच्या ताजमहालाएवढी (Tajmahal) असू शकते, अशी माहिती नासाच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. डेली मेल या न्यूज वेबसाइटने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हा लघुग्रह ताशी 50 हजार मैल अर्थात ताशी 80 हजार किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. 2021RL3 असं त्याचं नाव शास्त्रज्ञांनी ठेवलं आहे. 160 फूट ते 360 फूट एवढी त्याची लांबी असू शकते. याचा आकार किती आहे, हे डोळ्यांसमोर उभं राहण्यासाठी तुलनेची आकडेवारीही देण्यात आली आहे. ताजमहालाची लांबी 240 फूट, तर रुंदी 365 फूट आहे. म्हणजेच या लघुग्रहाची रुंदी जवळपास ताजमहालाएवढी आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ येणार आहे. पृथ्वीच्या कक्षेच्या 29,03,980 किलोमीटरच्या क्षेत्रात हा लघुग्रह प्रवेश करणार (Asteroid to enter in earth’s orbit) आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा लघुग्रह आज रात्री एक वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंतच्या काळात पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करील. चंद्राचं (Moon) पृथ्वीपासूनचं अंतर 3,84,399 किलोमीटर एवढं आहे. याचाच अर्थ असा, की चंद्राच्या तुलनेत हा लघुग्रह पृथ्वीपासून बराच जास्त अंतरावर आहे. तरीही नासाने धोक्याचा इशारा दिला आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ आला किंवा चुकून त्याची पृथ्वीशी टक्कर झालीच, तर त्याचा खूप मोठा वाईट परिणाम पृथ्वीवर होईल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे ही वाचा-Mission Inspiration: चार सामान्य नागरिक अंतराळ सफरीवर, पाहा PHOTOs हा लघुग्रह पृथ्वीच्या आणखी जवळ आल्यानंतर नासाचे शास्त्रज्ञ त्याच्या नेमक्या आकाराबद्दलची माहिती देऊ शकतील. हा लघुग्रह मंगळापासून गुरूपर्यंतच्या क्षेत्रात अंडाकार कक्षेत फिरतो आहे, असं नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. सौरमालेतल्या अन्य ग्रहांच्या तुलनेत हा लघुग्रह पृथ्वीच्या सगळ्यात जवळून जाणार आहे. पृथ्वीच्या कक्षेशी दररोज छोट्या-मोठ्या अशनींची म्हणजेच अंतराळातल्या छोट्या दगडांची टक्कर होत असते; मात्र ते आकाराने खूपच लहान असतात. त्यामुळे त्यांच्या टकरीचा पृथ्वीवर विशेष परिणाम होत नाही. साधारणतः एखाद्या कारच्या आकाराचा अशनी अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात आला, तर तो आपोआपच जळून खाक होतो. आज रात्री येणाऱ्या लघुग्रहाचा आकार बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे शास्त्रज्ञांना चिंता वाटते आहे.

    First published:

    Tags: Asteroid, Earth, Nasa

    पुढील बातम्या