नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, यानंतर त्यांना जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुनक यांचं ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. वैश्विक मुद्द्यांवर एकत्र काम करण्यासाठी आणि रोडमॅप 2030 ला लागू करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. ‘ऋषी सुनक यांना शुभेच्छा. तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान होत आहात. वैश्विक मुद्द्यांवर एकत्र येऊन काम करण्याची आणि रोडमॅप 2030 ला लागू करण्यासाठी उत्सुक आहे. ब्रिटीश भारतीयांचे जिवंत सेतूला दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही ऐतिसाहिक संबंधांना आधुनिक सहकार्यामध्ये बदललं आहे,’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Warmest congratulations @RishiSunak! As you become UK PM, I look forward to working closely together on global issues, and implementing Roadmap 2030. Special Diwali wishes to the 'living bridge' of UK Indians, as we transform our historic ties into a modern partnership.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022
लिज ट्रस यांची प्रतिक्रिया ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिज ट्रस यांनीही ट्वीट करून ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी सुनक यांचं कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि पुढचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन. माझं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे, असं लिज ट्रस म्हणाल्या. ऋषी सुनक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये नेतृत्व करणार आहेत. मी एका दशकापूर्वीच घोषणा केली होती, की कंजर्व्हेटिव्ह त्यांचा पहिला ब्रिटीश भारतीय पंतप्रधान निवडतील आणि तसंच झालं, याचा मला अभिमान आहे. माझं त्यांना पूर्ण समर्थन आहे, असं ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून म्हणाले. गीतेवर हात ठेवून शपथ, लंडनध्ये दिवाळी; यूकेचे नवे PM ऋषी सुनक यांच्या 10 खास गोष्टी ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच इतिहास घडवणार आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी पेनी मॉर्डंट यांनी या रेसमधून माघार घेत असल्याची घोषणा केली, यानंतर सुनक यांना कंजर्व्हेटिव्ह पार्टीने बिनविरोध नेता म्हणून निवडलं. माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना पक्षाच्या 357 मधल्या अर्ध्याहून अधिक खासदारांचं समर्थन मिळालं. सुनक यांना विजयासाठी कमीत कमी 100 खासदारांच्या पाठिंब्याची गरज होती.