म्यानमार 15 मे : म्यानमारमधील सैन्य तख्तापलटानंतर 100 दिवसांनी 32 वर्षीय सौंदर्यवतीनं (Myanmar beauty queen) बंड पुकारला आहे. आधुनिक शस्त्रांसोबत ती सैन्याच्या विरोधात उभा राहिली आहे. सैन्याच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात आता ती स्थानिकांसोबत सहभागी झाली आहे. 2013 मध्ये मिस ग्रँड आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत म्यानमारचे प्रतिनिधित्व करणार्या तारा टेट टेट (Htar Htet Htet) यांनी सोशल मीडियावर रायफलसोबत आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
तारा टेट यांनी लिहिलं, की क्रांती एखाद्या सफरचंदाप्रमाणं नाही, की तयार होताच स्वतःहून खाली पडेल. आपल्याला स्वतः लढावं लागेल आणि ही लढाई जिंकावी लागेल. पुन्हा एकदा लढण्याची वेळ परत आली आहे. तुम्ही स्वतःजवळ एक हत्यार, लेखणी किंवा किबोर्ड ठेवा नाहीतर लोकतंत्राच्या समर्थनात उभा राहून आंदोलनासाठी पैसे दान करा. प्रत्येकानं विजयी होण्यासाठी प्रयत्न करत राहाणं गरजेचं आहे. मी संघर्ष कायम ठेवेल. मी स्वतःचा जीवही बलिदान देण्यासाठी तयार आहे.
The revolution is not an apple that falls when it is ripe. You have to make it fall. (Che Guevara) We must Win 💪💪💪 pic.twitter.com/iHEDhF314p
— Htar Htet Htet (@HtarHtetHtet2) May 11, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या आवाहानानंतर अनेक लोक सैन्याच्या विरोधातील लढ्यासाठी मैदानात उतरले आहेत. तार टेट टेट यांनी 8 वर्षांपूर्वी 60 प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ब्यूटी क्वीनचा पुरस्कार आपल्या नावी केली होता.
या त्याच तार टेट टेट आहेत, ज्यांनी 2013 सौंदर्य स्पर्धांदरम्यान केलेल्या भाषणात सैन्याकडून होत असलेल्या कथित अत्याचारांबाबत बोलत संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या देशातील खराब परिस्थितीकडे खेचलं होतं. त्या सध्या जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण देतात. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार तख्तापलटानंतर जवळपास 800 लोकांनी जीव गमावला आहे. तर, हजारो लोक जखमी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty queen, Myanmar, Viral