जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Zoom मीटिंगदरम्यान खासदाराचं किळसवाणं कृत्य; यापूर्वीही दिसले होते न्यूड

Zoom मीटिंगदरम्यान खासदाराचं किळसवाणं कृत्य; यापूर्वीही दिसले होते न्यूड

Zoom मीटिंगदरम्यान खासदाराचं किळसवाणं कृत्य; यापूर्वीही दिसले होते न्यूड

एप्रिल महिन्यात अमोस यांचा एक स्क्रिनशॉट मीडियामध्ये लीक झाला होता. ज्यात ते सरकारी कामकाजादरम्यान नग्न अवस्थेत आढळले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

ओटोवा, 29 मे : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्या लिबरल पार्टीचे खासदास विलियम अमोस (William Amos) यांनी पुन्हा एकदा विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे. हे कॅनडीयन खासदार (Canadian MP) काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यासमोर विना कपड्यांचे दिसले होते. आता तर त्यांनी सर्व मर्यादा पार केली. हाऊस ऑफ कॉमन्सच्या Zoom मीटिंगदरम्यान अमोस लघुशंका करताना दिसले. यामुळे अत्यंत लज्जास्पद स्थिती निर्माण झाली आहे. खासदारांनी माफी मागितली विलियम अमोसने आपल्या कृत्यानंतर ट्वीट करून माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, काल रात्री, हाउस ऑफ कॉमन्सच्या मीटिंगमध्ये सामील असताना मी सार्वजनिकरित्या न करणारं काम केलं आहे. मी झूम कॉन्‍फरन्सदरम्यान लघुशंका केली (Urinate) , त्यानंतर मला जाणीव झाली की, माझा कॅमेरा सुरूच होता. मला याची लाज वाटत आहे आणि या कृत्यामुळे ज्यांना त्रास झाला त्यांची माफी मागतो. द गार्डियनच्या रिपोर्टच्या सूत्रांनी सांगितलं की, अमोस अमोस आपल्या डेस्कवरुन फोनवर बोलत होते, तेव्हा त्यांनी कॉफी कपमध्ये लघुशंका करण्याचा निर्णय घेतला. हे ही वाचा- अल्पवयीन मुलाकडून मित्राची निर्घृण हत्या, शवविच्छेदन रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

जाहिरात

विरोधकांकडून जोरदार टीका विरोधकांनी अमोस यांनी केलेले कृत्य अस्वीकार्य असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. हे खरंच अपघाताने घडलं होतं का?  Conservative पार्टीचे खासदार करेन वेचियो यांनी सांगितलं की, मिस्टर अमोस वारंवार असं कृत्य करीत असल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, ट्रूडोच्या पार्टीचे नेता काम करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी अपयशी ठरले आहेत. तर दुसरीकडे अमोस म्हणाले की, ते संसदेचे सदस्यपद सोडणार नाही. मात्र आपल्या संसदीय सचिव आणि समितीच्या भूमिकेत अस्थायी स्वरुपात राहतील. यापूर्वी एप्रिल महिन्यात अमोस यांचा एक स्क्रिनशॉट मीडियामध्ये लीक झाला होता. ज्यात ते सरकारी कामकाजादरम्यान नग्न अवस्थेत होते. यावर अमोस यांनी सांगितलं होतं की, जॉगिंगनंतर ते कपडे बदलत होते आणि त्यांना कॅमेरा सुरू असल्याचं माहिती नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात