मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ISIS दहशतवादी अबू इब्राहिमच्या मृत्यूनंतर काय होणार इस्लामिक स्टेटचं?, कोण असेल नवा उत्तराधिकारी?

ISIS दहशतवादी अबू इब्राहिमच्या मृत्यूनंतर काय होणार इस्लामिक स्टेटचं?, कोण असेल नवा उत्तराधिकारी?

सीरियामध्ये (Syria) अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा नेता (Islamic State leader) अबू इब्राहिम अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Qureshi) ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर  जिहादी गटाच्या भवितव्याबद्दल बरीच चर्चा आहे.

सीरियामध्ये (Syria) अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा नेता (Islamic State leader) अबू इब्राहिम अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Qureshi) ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर जिहादी गटाच्या भवितव्याबद्दल बरीच चर्चा आहे.

सीरियामध्ये (Syria) अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा नेता (Islamic State leader) अबू इब्राहिम अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Qureshi) ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर जिहादी गटाच्या भवितव्याबद्दल बरीच चर्चा आहे.

न्यूयॉर्क, 05 फेब्रुवारी: सीरियामध्ये (Syria) अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा नेता (Islamic State leader) अबू इब्राहिम अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Qureshi) ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर जिहादी गटाच्या भवितव्याबद्दल बरीच चर्चा आहे. अबू इब्राहिम नंतर इस्लामिक स्टेटचं रुप कसं असू शकतं? ते कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये कोणते बदल करण्याची शक्यता आहे? जाणून घेऊया थोडक्यात.

इस्लामिक स्टेटला मोठा धक्का

ब्रुकिंग्स संस्थेत काम करणाऱ्या चार्ली लिस्टरने एनपीआरला सांगितलं की, 2014 मध्ये बगदादी मारला गेला तेव्हा इस्लामिक स्टेट त्याच्या उत्कर्षाच्या काळात होते. अशा स्थितीत दहशतवादी संघटनेला एका नेत्याची गरज होती, पण अबू इब्राहिमच्या मृत्यूच्या वेळी तसं नाही आहे. ते नवीन नेत्याच्या जागी एक कमांडर घेऊ शकतात जे त्यांच्या गनिमी ऑपरेशन हाताळू शकेल.

Corona ची तिसरी लाट मार्चपर्यंत संपणार?, ICMR चा नवा दावा 

गेल्या काही काळापासून इस्लामिक स्टेट पुन्हा उदयास येण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत इस्लामिक स्टेटसाठी हा धक्काच आहे. अबू इब्राहिमच्या मृत्यूमुळे इस्लामिक स्टेट कमकुवत झालं आहे. विशेषत: जिहादी गटांचे केंद्र राहिलेल्या सीरिया आणि इराकसारख्या भागात.

अबू इब्राहिमची जागा कोण घेणार?

अबू इब्राहिमचा उत्तराधिकारी कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण या दहशतवादी संघटनेबाबत अशी माहिती सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाही, असं लिस्टरचे मत आहे. मात्र हे स्पष्ट आहे की, इस्लामिक स्टेट ही नेत्यांची फौज असलेली एक पुराणमतवादी नोकरशाही आहे. जोपर्यंत नावाचा संबंध आहे, तेथे कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही तज्ज्ञ म्हणतात की, उत्तराधिकारीसाठी काही स्पष्ट नावे आहेत मात्र पुढील नेता त्याच भागातून येण्याची शक्यता आहे.

सीरियात Air Strike मध्ये मारला गेला ISIS दहशतवादी अल-हाशिमी अल-कुरेशी

अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी गुरुवारी सीरियामध्ये (Syria) मोठी लष्करी कारवाई केली. यामध्ये इस्लामिक स्टेटचा (Islamic State) कमांडर इब्राहिम अल-हाश्मी अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) ठार झाला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यादरम्यान (US Air Strike) हाशिमीने स्वत:ला बॉम्बने उडवलं. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

सीरियात ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला (ISIS Leader Abu Ibrahim Al Hashimi Al Qurayshi) ठार मारल्याचा दावा अमेरिकेनं गुरुवारी केला. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. बायडेन म्हणाले कि, काल रात्री माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने जगासाठी मोठा दहशतवादी धोका असलेल्या इसिसच्या जागतिक नेत्याला ठार केलं.

अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुराशी, ज्याला अब्दुल्ला करदाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखलं जातं, हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला. अबू बकर अल-बगदादीने देखील 2019 मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्यानं केलेल्या अशाच हल्ल्यात स्वतःला स्फोट घडवून उडवलं.

बगदादीनंतर संघटनेची कमान घेतली होती हाती

AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सीरियामध्ये अमेरिकेच्या विशेष दलाने केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेट गटाचा प्रमुख मारला गेला. अमेरिकेच्या हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी मारला गेल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 रोजी दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतलेल्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं.

First published:

Tags: Death, International, ISIS, Islamabad united, Joe biden, Syria, USA