ऑफिसच्या कॉकटेल पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा, मद्यपीसोबत तरुणींचे अश्लील डान्स

ऑफिसच्या कॉकटेल पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा, मद्यपीसोबत तरुणींचे अश्लील डान्स

या पार्टीमध्ये शहरातील नामांकित उद्योजकांपासून सत्ताधारी पक्षाचे बडे नेतेही सहभागी झाले होते आणि बार गर्ल्स नृत्यावर अश्लील नृत्य करताना दिसल्या.

  • Share this:

सरगुजा (छत्तीसग), 27 ऑक्टोबर : एका हॉटेलमध्ये आयोजित अश्लील कॉकटेल पार्टीमध्ये मद्यपीसह महिलांनी अश्लील नृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीशी संबंधित डिलर आणि दुकान चालकांसाठी पॅंथर सिमेंट डीलरने पार्टी आयोजित केली होती. या कार्यक्रमात महिलांच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. मद्यपींसह अनेक महिला या पार्टीमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये शहरातील नामांकित उद्योजकांपासून सत्ताधारी पक्षाचे बडे नेतेही सहभागी झाले होते आणि बार गर्ल्स नृत्यावर अश्लील नृत्य करताना दिसल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर शहरात चर्चेचे वातावरण आहे. तसंच सणासुदीच्या काळात असे प्रकार समोर आल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या कार्यक्रमाविषयी प्रशासनाला माहिती दिली जात नाही

शहरातील मध्यभागी महामाया चौकात असलेल्या एका मोठ्या खासगी हॉटेलच्या हॉलमध्ये ही पार्टी चालू होती. येथे कंपनीशी संबंधित लोकांकडून  खुलेआम दारू पिण्यात येत होती आणि महिलांचे अश्लील नृत्य सुरू होते.  बार नर्तकांसह सुरगुजाच्या प्रसिद्ध व्यावसायिक आणि सुमारे 12 दुकान चालकांना या पार्टीमध्ये बोलवण्यात आलं होतं. बार गर्ल डान्सर्सनी अश्लील डान्स करुन तेथे उपस्थित लोकांचे मनोरंजन केले. जिल्हा प्रशासनाने असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली नव्हती. प्रशासनाच्या नाकाखाली असे अश्लील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

'तक्रार आल्यास आम्ही चौकशी करू'

या प्रकरणाविषयी विचारलं असता अंबिकापूरचे एसडीएम अजय त्रिपाठी आपल्याला काही माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर असं कोणतंही प्रकरण निदर्शनास आलं नाही असंही ते म्हणाले.  ते म्हणाले की, त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी नव्हती. दुसरीकडे, सुरगुजाचे अतिरिक्त एसपी ओम एसपी चंदेल म्हणाले की, आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही. तक्रार आल्यावर आम्ही त्याची चौकशी करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 10:24 AM IST

ताज्या बातम्या