मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

वितळत्या हिमनदीमुळे उघड झालं 54 वर्षांपूर्वीचं रहस्य, मानवी हाडांसोबत मिळाला विमानाचा सांगाडा

वितळत्या हिमनदीमुळे उघड झालं 54 वर्षांपूर्वीचं रहस्य, मानवी हाडांसोबत मिळाला विमानाचा सांगाडा

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

वितळलेल्या हिमनदीमुळे तयार झालेल्या पाण्यात एका दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध लागला आहे. 1968 च्या जून महिन्यात जंगफ्राऊ (Jung) आणि मोन्च (Monch) पर्वतशिखरांच्या जवळ एल्तेश ग्लेशियरच्या (Eltesh Glacier) परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : युरोपमध्ये या वेळेस असह्य उकाडा होता. दरवर्षी उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे आता तिथल्या हिमनद्या (Glaciers) वितळू लागल्या आहेत. स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) वितळत असलेल्या या हिमनद्यांमुळे अनेक वर्ष गाडली गेलेली रहस्य उघड होऊ लागली आहेत. याबाबत टीव्ही 9 भारतवर्षच्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे. या वाढत्या उष्णतेमुळे ज्या हिमनद्या (Glaciers) वितळत आहेत, त्यांच्याकडे पोलिसांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. आल्प्समध्ये नोंद झालेल्या विक्रमी उच्च तापमानामुळे (Recorded Highest Temperature) हिमनदी वितळली. वितळलेल्या हिमनदीमुळे तयार झालेल्या पाण्यात एका दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध लागला आहे. 1968 च्या जून महिन्यात जंगफ्राऊ (Jung) आणि मोन्च (Monch) पर्वतशिखरांच्या जवळ एल्तेश ग्लेशियरच्या (Eltesh Glacier) परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका गिर्यारोहण मार्गदर्शकाने या विमानाचा शोध लावला होता. थोडक्यात, या वितळत्या ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्यांमुळे 54 वर्षांपूर्वीचं रहस्य समोर आलं आहे. इथं मानवी हाडांसोबत विमानाचा सांगाडाही सापडला आहे. याप्रकरणी सोमवारी पोलिसांच्या एका प्रवक्त्याने माहिती दिली आहे, असं द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या बुधवारी (10 ऑगस्ट 22) दोन फ्रेंच गिर्यारोहकांना वॅलेसच्या दक्षिण कँटनमध्ये चेसजेन ग्लेशियरची (Chasjen Glacier) मोजणी करताना माणसाची हाडं सापडली, असं या प्रवक्त्यानं सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या मानवी सांगाड्याला त्याचदिवशी ग्लेशियरमधून विमानाच्या मदतीने उचलण्यात आलं म्हणजे एअरलिफ्ट (Airlift) करण्यात आलं होतं. ही हाडं एका जुन्या रस्त्याजवळ सापडल्याचं ब्रिटिश गिर्यारोहण संस्था (British Mountain climbing ) वॉर्डन डारिओ एंडेनमेटन यांनी सांगितल्याचं द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ज्या रस्त्याजवळ ही हाडं सापडली त्या रस्त्याचा येण्याजाण्यासाठी वापर 10 वर्षांपासूनच बंद करण्यात आला होता. त्याआधी अनेक गिर्यारोहक या भागातून गिर्यारोहणाला सुरुवात करत असत अशी माहिती आहे. जुना नकाशा पाहत असल्यामुळे कदाचित त्यांना या रस्त्यावर हाडं सापडल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मानवी सांगाड्यामध्ये काही नग्न हाडांच्या व्यतिरिक्त अन्य अवशेष खूप कमी होते, असं एंडेनमॅटननं म्हटलं आहे. हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश या व्यक्तीचा मृत्यू 1970 किंवा 80 च्या दशकात झाल्याचा अंदाज आहे. एकच आठवड्यापूर्वी मॅटरहॉर्नच्या उत्तर पश्चिम भागात जर्मेट रिसॉर्टच्या (Germet ) परिसरात आणखी एक मृतदेह मिळाला होता. या दोन्ही प्रकरणांत ओळख पटवण्यासाठी पोलीस आता डीएनए प्रक्रिया (DNA process) करत आहेत. ही डीएनए प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मानवी सांगाडा ज्यांना सापडला त्या दोन प्रवाशांना जे कपडे सापडले ते 80 च्या दशकांतील स्टाईलचे आहेत, अशी माहिती त्यांनी ब्लिंक वर्तमानपत्राला दिली. हा मृतदेह थोडा खराब झाल्याचं गिर्यारोहक ल्यूक लेचनोईननं सांगितलं. हे वाचा -  Rakshabandhan 2022: देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधन कोणत्या नावानं ओळखलं जातं अल्पाइन परिसरात 1925 सालापासून बेपत्ता झालेल्या जवळपास 300 व्यक्ती आणि प्रकरणांची एक यादीच पोलिसांनी तयार केली आहे. यामध्ये सुपरमार्केट चेन असलेले करोडपती कार्ल- एरिवन हाब, एक जर्मन, रशियन आणि अमेरिकन नागरिक यांचा समावेश आहे. रशियन आणि अमेरिकन नागरिक 7 एप्रिल 2018 रोजी स्किईंग टूर प्रशिक्षणादरम्यान जर्मेट परिसरात बेपत्ता झाले होते. तर स्टॉकजी ग्लेशियरवर मिळालेला मृतदेह करोड़पती हाबचा असू शकतो असा अंदाज मीडियानं व्यक्त केला होता. हाबला 2021 मध्ये मृत घोषित करण्यात आलं होतं. वातावरण बदलाचा पर्यावरणवर परिणाम होत आहे हे अनेकदा बोललं जात आहे,पण त्यामुळे जमिनीच्या पोटात गडप झालेली अनेक रहस्यही उघड होऊ लागली आहेत.
First published:

Tags: Airplane, International

पुढील बातम्या