मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मेहुल चोक्सीचा भाऊ डोमिनिकामध्ये का पोहोचला? नेत्याला लाच दिल्याचा दावा

मेहुल चोक्सीचा भाऊ डोमिनिकामध्ये का पोहोचला? नेत्याला लाच दिल्याचा दावा

मेहुल चोक्सीचा भाऊ चेतन चीनू चोक्सी (Chetan Choksi) 29 मे रोजी प्रायवेट जेटनं डोमिनिका येथे पोहोचला होता. यावेळी त्यानं तेथील एक विरोधीपक्ष नेता लेनोक्स लिंटन यांची भेट घेतली होती.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 02 जून : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी पोलीस शोध घेत असलेला फरार व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात बंद आहे. भारतीय एजन्सी त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान अँटिग्वामधील ऑनलाईन पोर्टल असोसिएट्स टाइम्सनं असं वृत्त दिलं आहे, की मेहुल चोक्सीचा भाऊ चेतन चीनू चोक्सी (Chetan Choksi) 29 मे रोजी प्रायवेट जेटनं डोमिनिका येथे पोहोचला होता. यावेळी त्यानं तेथील एक विरोधीपक्ष नेता लेनोक्स लिंटन यांची भेट घेतली होती. असोसिएट्स टाइम्सनं असा दावा केला आहे, की चेतन चोक्सीने डोमिनिकामधील या नेत्याला लाच म्हणून 2 लाख अमेरिकी डॉलर दिले आहेत. इतकंच नाही तर चेतननं लेनोक्सला आगामी निवडणुकांमध्ये मदतीचं आश्वासनही दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतननं लिंटनला तेथील संसदेत मेहुल चोक्सीचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितलं आणि मेहुल चोक्सीच्या बाजूने निवेदन करण्यास सांगितलं. या प्रकरणातील तज्ज्ञांचे म्हणणं आहे, की चेतन चोक्सी Diminco NV नावाची कंपनी चालवितो. ही कंपनी हाँगकाँगच्या डिजिको होल्डिंग्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. ही कंपनी हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायातील सर्वात मोठे विक्रेते म्हणून गणली जाते. लंडनमध्ये नीरव मोदीशी संबंधित सुनावणीदरम्यानही चेतनला 2019 मध्ये कोर्टाबाहेरही पाहिलं गेल्याचं म्हटलं जातं. CBSE 12वी परीक्षा रद्द, निकाल मान्य नसल्यास विद्यार्थ्यांसमोर 'हा' पर्याय हिंदुस्तान टाइम्समधील वृत्ता असं म्हटलं गेलं आहे, की डोमिनिकाच्या यूनायटेड वर्कर्स पार्टीचे नेते लेनोक्स लिंटननं मेहुल चोक्सी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीच्या मिशनलाठी CBI आणि ED ची टीम रवाना झाली आहे. कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या कोर्टात आज बुधवारी चोक्सीला बाहेर पाठवण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणीसाठी या टीम कोर्टात हजर राहातील. डोमिनिकामध्ये गेलेल्या या दोन्ही टीममध्ये मुंबई झोनचे तपास अधिकारी सामील आहेत.
First published:

Tags: Criminal, Pnb

पुढील बातम्या