मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'अलीबाबा'च्या साम्राज्याला उतरती कळा; जॅक मा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट कारणीभूत?

'अलीबाबा'च्या साम्राज्याला उतरती कळा; जॅक मा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट कारणीभूत?

जॅक मा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (U.N. Secretary General Antonio Guterres), जॉर्डनची राणी रानिया (Queen Rania of Jordan), मलेशियाचे दिग्गज राजकारणी महाथिर मोहम्मद (Mahathir Mohamad) आणि बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान चार्ल्स मिशेल (Charles Michel) यांच्या भेटी घेतल्या होत्या.

जॅक मा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (U.N. Secretary General Antonio Guterres), जॉर्डनची राणी रानिया (Queen Rania of Jordan), मलेशियाचे दिग्गज राजकारणी महाथिर मोहम्मद (Mahathir Mohamad) आणि बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान चार्ल्स मिशेल (Charles Michel) यांच्या भेटी घेतल्या होत्या.

जॅक मा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (U.N. Secretary General Antonio Guterres), जॉर्डनची राणी रानिया (Queen Rania of Jordan), मलेशियाचे दिग्गज राजकारणी महाथिर मोहम्मद (Mahathir Mohamad) आणि बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान चार्ल्स मिशेल (Charles Michel) यांच्या भेटी घेतल्या होत्या.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : चीनमधले (China)अब्जाधीश उद्योजक आणि अलिबाबा (Alibaba) या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांचा अज्ञातवास, त्यांचे आणि चीन सरकारचे बिघडलेले संबंध, त्यांच्या उद्योग साम्राज्याचं झालेलं प्रचंड नुकसान याची जगभरात चर्चा आहे. या सगळ्यासाठी कारणीभूत ठरली ती जॅक मा यांनी 2017 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष (USA President) म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची घेतलेली भेट. सध्या चीन आणि अमेरिकेचे संबंध आणखी ताणलेले असताना या भेटीला उजाळा मिळाला आहे. ट्रम्प यांची भेट जॅक मा यांच्या आयुष्याला आणि व्यवसायाला टर्निंग पॉइंट (Turning Point) देणारी ठरली. न्यूयॉर्कमधल्या ट्रम्प टॉवर इथं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जॅक मा यांचे चीन सरकारसोबतचे (Bejing) संबंध ताणले गेले. त्याचा अत्यंत विपरीत परिणाम त्यांच्या उद्योगावर झाला.

  ट्रम्प यांच्याशी झालेल्या या भेटीत जॅक मा यांनी लाखो अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या (Jobs) देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे चीन सरकारची त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली आहे. रॉयटर्सचा हवाला देऊन एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधले संबंध ताणलेले असतानाच 9 जानेवारी रोजी ट्रम्प आणि जॅक मा यांच्यात ही बैठक झाली होती. त्यावेळी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, त्या वेळी ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान चीनवर टीका केली आणि अमेरिकेच्या नोकऱ्यांचं चीनमुळे नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. त्याच वेळी जॅक मा यांच्याबरोबर ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर जॅक मा यांनी एका वाहिनीला अनौपचारिक मुलाखत देऊन चीनबाहेरच्या देशातल्या नागरिकांना नोकऱ्या देण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे चीन सरकार हादरलं. कारण हे त्यांच्या धोरणाविरुद्ध होतं. एकप्रकारे मा यांनी चीन सरकारला केलेला हा विरोधच होता. त्यामुळे चीन सरकार नाराज झालं आणि त्याचा फटका जॅक मा यांना सोसावा लागला. प्रदीर्घ काळ ते अज्ञातवासात गेले. त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. ही बैठकच जॅक मा आणि चीन सरकारमधल्या संबंधांना नकारात्मक वळण देणारी ठरल्याचं अलीबाबाच्या चार वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं.

  क्रिप्टो वॉलेट संबंधित Google Ads वर क्लिक नका करु, होऊ शकतं नुकसान; वाचा संपूर्ण प्रकरण

  चीन सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय जॅक मा यांनी ट्रम्प यांची भेट घेतल्यानं सरकार नाराज असल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी अलीबाबा समूहाच्या सरकारी संबंध हाताळणाऱ्या गटाला सांगितलं, अशी माहिती कंपनीच्या विश्वासार्ह सूत्रांनी दिली; मात्र याबाबत जॅक मा यांचे माध्यम संपर्क हाताळणाऱ्या चॅरिटेबल फाउंडेशननं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

  दरम्यान, ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर जॅक मा यांनी जगभरातल्या अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतल्या. अलिझिला (Alizila) न्यूज पोर्टल आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 आणि 2020 दरम्यान, जॅक मा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (U.N. Secretary General Antonio Guterres), जॉर्डनची राणी रानिया (Queen Rania of Jordan), मलेशियाचे दिग्गज राजकारणी महाथिर मोहम्मद (Mahathir Mohamad) आणि बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान चार्ल्स मिशेल (Charles Michel) यांच्या भेटी घेतल्या होत्या.

  त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. सर्वांत यशस्वी आणि प्रभावशाली व्यावसायिकांपैकी एक असलेल्या मा यांचं आयुष्य पार बदलून गेलं. त्यांना चीन सरकारच्या भीतीनं अज्ञातवासात जावं लागलं. त्यांच्या उद्योगाचं वर्षाला जवळपास 350 कोटींचं नुकसान झालं. त्यांच्यावर अनेक बंधनं आली. देशविरोधी समूह असल्याचं मत निर्माण केलं जाऊ लागलं. मा यांनी आपल्यावरच्या बंदीच्या सुनावणीबाबत चीनचे पंतप्रधान शी यांच्या जवळच्या दोन व्यक्तींना विनंती केली होती. परंतु त्या दोघांनीही ती विनंती फेटाळून लावली. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला जॅक मा यांनी थेट शी यांना पत्र लिहून आपले उर्वरित आयुष्य चीनमधल्या ग्रामीण शिक्षणासाठी समर्पित करण्याचा प्रस्ताव मांडला. सरकारी सूत्रानुसार, शी यांनी मे महिन्यात देशातल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या पत्राबाबत सांगितलं होतं; मात्र त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली की नाही, याबद्दल रॉयटर्सला कोणतीही माहिती मिळालेली नाही.

  Cryptocurrency: या 6 नाण्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल, दिवसाला 2,340.75% चा फायदा

  चीन सरकारचं स्टेट कौन्सिल ऑफ इन्फॉर्मेशन ऑफिस आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही या प्रकरणाबाबत (The State Council Information Office और the Ministry of Foreign Affairs) कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. तसंच प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सर्व सूत्रांनी नाव देण्यासही नकार दिला आहे.

  दरम्यान, साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात जॅक मा यांनी पर्यावरणविषयक समस्यांशी संबंधित कृषी आणि तंत्रज्ञान अभ्यासासाठी युरोपचा दौरा केला. पांढरा गाउन घातलेल्या फुलझाडाची कुंडी हातात धरलेल्या जॅक मा यांचे फोटो गेल्या आठवड्यात प्रकाशित झाले. जॅक मा यापुढेही आपल्या योजनांशी निगडित व्यक्तींसह, कृषी पायाभूत सुविधा आणि वनस्पती प्रजनन क्षेत्रातील युरोपीय कंपन्या आणि संशोधन संस्थांना भेट देत राहतील, असं अलीबाबा समूहाने म्हटलं आहे.

  अलीबाबाचे सह-संस्थापक त्साई यांनी जूनमध्ये सीएनबीसीच्या Squawk Box शोमध्ये आपले दीर्घ काळाचे सहकारी मा यांच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी केली होती. 'जॅक मा अजूनही अज्ञातवासात असून, मी रोज त्यांच्याशी बोलतो. ते खूप शक्तीशाली किंवा प्रभावी नाहीत तर ते तुमच्या आणि माझ्यासारखेच एक सामान्य माणूस आहेत,' असं त्साई यांनी म्हटलं होतं.

  First published:
  top videos

   Tags: China, Donald Trump