• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • क्रिप्टो वॉलेट संबंधित Google Ads वर क्लिक नका करु, होऊ शकतं नुकसान; वाचा संपूर्ण प्रकरण

क्रिप्टो वॉलेट संबंधित Google Ads वर क्लिक नका करु, होऊ शकतं नुकसान; वाचा संपूर्ण प्रकरण

चेक पॉईंट रिसर्च म्हणते की या संपूर्ण फसवणुकीने (Online Fraud) आठवड्याच्या शेवटी 500,000 डॉलर्सहून जास्त क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली आहे. परंतु स्कॅमर्सनी या वॉलेटचा शोध लागण्यापूर्वीच यापैकी काही रक्कम काढून टाकली.

 • Share this:
  मुंबई, 5 नोव्हेंबर : डिजिटल करन्सीचा (Digital Curency) ट्रेंड वाढत असतानाच दुसरीकडे त्याच्याशी संबंधित घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. चेक पॉइंट रिसर्च (CPR) नुसार, स्कॅमर्सनी गुगल सर्चवर जाहिराती टाकल्या आहेत ज्या लोकप्रिय क्रिप्टो वॉलेट आणि Phantom आणि मेटामास्क (Metamask) सारख्या प्लॅटफॉर्मची कॉपी करतात. एकदा तुम्ही त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर, ती तुम्हाला थेट एका प्रसिद्ध वॉलेट ब्रँडप्रमाणे दिसणार्‍या वेबसाइटवर जाता आणि तुमचे वॉलेट लॉगिन तपशील तिथे घेतलं जाईल. चेक पॉईंट रिसर्च म्हणते की या संपूर्ण फसवणुकीने (Online Fraud) आठवड्याच्या शेवटी 500,000 डॉलर्सहून जास्त क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली आहे. परंतु स्कॅमर्सनी या वॉलेटचा शोध लागण्यापूर्वीच यापैकी काही रक्कम काढून टाकली. काही दिवसांत, आम्ही लाखो डॉलर्स किमतीचे क्रिप्टो चोरीला गेल्याचे पाहिले, असे CPR मधील प्रोडक्ट वूलनेरेबिलिटी रिसर्टचे प्रमुख ओडेड वानुनु म्हणाले. दिवाळीदिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण, मुंबईत तरीही भाव शंभरीपारच! वानुनु पुढे म्हणाले की, आमचा अंदाज आहे की गेल्या आठवड्याच्या शेवटी 5 लाख डॉलर पेक्षा जास्त किमतीची क्रिप्टो चोरीला गेले. आपण एका नवीन सायबर क्राईम ट्रेंडला बळी पडत आहोत जिथे स्कॅमर पारंपारिकपणे ईमेलद्वारे फिशिंग करण्याऐवजी, Google सर्चला प्रायमरी अटॅक वेक्टर म्हणून वापरत आहे. प्रत्येक फसव्या वेबसाइटवर वॉर्निंग मेसेज आणि कीवर्ड सिलेक्शन असते. ज्यामुळे स्कॅमरना Google सर्च चालवता येतो आणि त्यांना सर्च रिझल्ट टॉपवर दिसतो. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर बनावट वेबसाईटवर युजर पोहोचतात. त्या ब्रँड मेसेजिंगची कॉपी काळजीपूर्वक केलेली असते, असं वानुनु यांनी म्हटलं. Cryptocurrency: या 6 नाण्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल, दिवसाला 2,340.75% चा फायदा दुर्दैवाने, सायबर गुन्ह्यांमध्ये हा एक वेगाने वाढणारा ट्रेंड बनेल असं मला वाटतं. त्यामुळे मी क्रिप्टो कम्युनिटीला आवाहन करतो की त्यांनी क्लिक केलेल्या URLs पुन्हा पुन्हा तपासा आणि क्रिप्टो वॉलेटच्या संबंधीत गूगल अॅड्स क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा, असं वानुनु म्हणाले.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: