सादा, 21 जानेवारी: येमेनवर (
Yemen) झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये (
Air Strike) अनेकांचा जीव (
Many Dead) गेला आहे. काही विस्थापितांच्या (
Refugee) मुक्कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावण्यांवर (Temporary detention center) बॉम्बवर्षाव (
Bomb attack) झाल्यामुळे अनेकांचा त्यात बळी गेल्याची माहिती येमेनच्या प्रशासनाने दिली आहे. सौदी अरेबिया गटाने येमेनवर हा हल्ला केला असून त्यामुळे दोन्ही गटांतील रक्तरंजित संघर्ष अधिकच तीव्र झाल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही वर्षांपासून येमेन विरुद्ध सौदी अरेबिया संघर्ष पेटला आहे. नुकताच येमेनच्या हौथी चळवळीतील गटाने अबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ला केला होता. अबुधाबीत बांधकाम सुरू असलेल्या नव्या विमानतळाच्या परिसरात हा हल्ला झाला होता. यातील एक ड्रोन तेलाच्या टँकरवर पडल्यामुळे मोठा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता. त्यानंतर सौदी अरेबिया गटाने आपली आक्रमकता वाढवली असून सलग दुसरा एअर स्ट्राईक येमेनवर केला आहे.
येमेनमध्ये प्रचंड दहशत
हा हल्ला झालेल्या भागात काही अफ्रिकन नागरिक राहत होते. त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या, अशी माहिती येमेन सरकारने दिली आहे. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अद्यापही अनेकजणांचे मृतदेह मिळाले नसून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
हे वाचा-
अमेरिकेच्या सीमेवर 4 भारतीयांचे मृतदेह आढळल्याने खळबळ; एका नवजात बाळाचाही समावेश
इंटरनेट ठप्प
येमेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा ठप्प आहे. येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदेन शहरातच केवळ इंटरनेट सेवा सुरळीत सुरू होती. सौदी अरेबिया गटाच्या विमानांनी नेमक्या याच भागाला लक्ष्य करून तिथली इंटरनेट सेवाही बंद पाडण्याच्या हेतूनंच हा हल्ला केल्याचा आरोप येमेननं केला आहे. अद्याप या हल्ल्यामागची भूमिका सौदी अरेबियानं स्पष्ट केलेली नाही. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा तणाव वाढला असून भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.