मराठी बातम्या /बातम्या /विदेश /नाव बुडाल्यानंतर घेतला चक्क फ्रीजरचा आधार; तब्बल 11 दिवस केला समुद्रात प्रवास

नाव बुडाल्यानंतर घेतला चक्क फ्रीजरचा आधार; तब्बल 11 दिवस केला समुद्रात प्रवास

नाव बुडाल्यानंतर घेतला चक्क फ्रीजरचा आधार; तब्बल 11 दिवस तसाच केला समुद्रात प्रवास

नाव बुडाल्यानंतर घेतला चक्क फ्रीजरचा आधार; तब्बल 11 दिवस तसाच केला समुद्रात प्रवास

Brazil Man survives 11 days in ocean: नॉर्थ ब्राझीलमध्ये राहणाऱ्या रोमुआल्डो मॅसेडो रोड्रिगेज या व्यक्तीच्या आयुष्यातही असाच काहीसा प्रसंग घडला होता. समुद्रात नाव बुडाल्यानंतर रोमुआल्डोचा जीव अशा प्रकारे वाचला (Man Survives in Ocean) आहे

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 3 सप्टेंबर: आयुष्यात अपघात हे काही सांगून होत नाहीत. काही वेळा छोटेसे अपघात होतात, जे खरं तर पुढे लक्षातही राहत नाहीत. मात्र काही वेळा आयुष्य आपल्याला असा धडा शिकवतं; जो आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. नॉर्थ ब्राझीलमध्ये राहणाऱ्या रोमुआल्डो मॅसेडो रोड्रिगेज (Romualdo Macedo Rodrigues) या व्यक्तीच्या आयुष्यातही असाच काहीसा प्रसंग घडला होता. समुद्रात नाव बुडाल्यानंतर रोमुआल्डोचा जीव अशा प्रकारे वाचला  (Man survives 11 days in ocean) आहे, जणू त्याला दुसरा जन्मच मिळाला असावा.

    काही दिवसांपूर्वी 44 वर्षांच्या रोमुआल्डोने आपली सात मीटर लांबीची लाकडी नाव समुद्रात नेण्याचा निर्णय घेतला होता. केवळ फिरण्यासाठी, आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी म्हणून त्याने आपली नाव चक्क अटलांटिक (Brazil man in Atlantic Ocean) समुद्रात नेली. थोडं दूर गेल्यानंतर त्याला नाव चालवण्यास अडचण येऊ लागली. नंतर त्याच्या लक्षात आलं, की नाव बुडत आहे. आजूबाजूला दूरपर्यंत पसरलेला समुद्र, त्यामध्ये भयानक शार्क मासे आणि हळूहळू बुडत असलेली नाव अशा दुष्टचक्रात रोमुआल्डो (Man stuck in Ocean) अडकला होता.

    फ्रीजरने वाचवला जीव-

    या सगळ्यातही त्याने पट्कन विचार केला. रोमुआल्डोच्या नावेवर एक फ्रीजर होता, जो पाण्यावर तरंगू शकत होता. रोमुआल्डोने पट्कन नाव सोडून या फ्रीजरवर बसण्याचं ठरवलं. त्यानंतर तब्बल 11 दिवस तो या फ्रीजरवर बसून होता. अखेर, त्याला वाचवण्यात यश आलं. या फ्रीजरवर बसून त्याने तब्बल 280 मैल अंतर पार केलं. जीव वाचल्यानंतर रोमुआल्डोने या फ्रीजरला आपला देव म्हटलं.

    प्रकृती ढासळली-

    या 11 दिवसांमध्ये रोमुआल्डोची प्रकृती अगदी खराब झाली होती. त्याचं पाच किलो वजन कमी झालं होतं. तसंच, सतत सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे त्याची दृष्टी क्षीण झाली होती. शरीरात पाणी नसल्यामुळे त्याच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं होतं. अगदी त्याला जेव्हा वाचवण्यात  आलं, तेव्हाही तो भानावर नव्हता.

    हेही वाचा-'कच्चा बादाम'नंतर सोशल मीडियावर 'भोपाळी नमकीन'चा तडका; तुम्ही हा VIDEO पाहिलात का?

    स्थानिक मीडियाशी बोलताना रोमुआल्डोने आपला भयानक अनुभव सर्वांना सांगितला. आपण वाचण्याच्या सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तसंच दररोज आजूबाजूला असणाऱ्या शार्क माशांच्या भीतीखाली आपण राहत होतो, असं त्याने सांगितलं. वाचल्यानंतर हा आपला दुसरा जन्मच असल्याचं मत रोमुआल्डोने व्यक्त केलं.

    खतरनाक शार्क माशांनी भरलेल्या समुद्रात तब्बल 11 दिवस एका फ्रीजरवर बसून जिवंत राहणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच रोमुआल्डोच्या रेस्क्युची गोष्ट जगभरात व्हायरल होत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Deep ocean, Rescue operation, Travel