बँकॉक, 29 डिसेंबर : मृत्यूचा ट्रॅक अशा नावाने बदनाम असलेल्या रेल्वे मार्गावर पडल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. पर्यटक धावत्या ट्रेनमध्ये सेल्फी घेत असताना ही दुर्घटना घडली. ट्रेनमध्ये घसरून तो खाली पडला अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. थायलंडमध्ये हा प्रकार समोर आला असून याचा व्हिडीओ एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आयरिश नागरिक असलेला पॅट्रिक वार्ड हा 26 डिसेंबर रोजी टुरिस्ट व्हिसावर थायलंडला आला होता. बँकॉकहून कंचनबुरी टाउनपर्यंत येणाऱ्या रेल्वेतून तो प्रवास करत होता. या रेल्वेमार्गाला डेथ रेलरोड म्हणजेच मृत्यूचा ट्रॅक अशा नावानेही ओळखलं जातं. हा ट्रॅक थायलंड आणि बर्मा यांना जोडतो. तसंत या रेल्वे मार्गावर प्रसिद्ध असा धबधबासुद्धा आहे.
हेही वाचा : पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, धबधब्याजवळून जाताना जेव्हा रेल्वेचा वेग कमी झाला तेव्हा वार्डने ट्रेनचा दरवाजा उघडला. त्यानंतर फोटो क्लिक करण्याच्या नादात तो खाली पडला. यावेळी इतर प्रवासीसुद्धा बाहेरचे व्हिडीओ शूट करत होते. त्यांच्या कॅमेऱ्यात वार्ड ट्रेनमधून खाली पडत असल्याचं शूट झालं.
वार्ड खाली पडल्याचं समजताच इमर्जन्सी सर्विसला फोन केला गेला. यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जेव्हा बचाव पथकातील लोक वार्ड यांच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांना श्वास घेता येत नव्हता आणि हाथ, मानेचं हाड मोडलं होतं.
हेही वाचा : हॉटेलमध्ये भीषण आग; लोकांनी पाचव्या मजल्यावरुन घेतल्या उड्या, 10 जणांचा मृत्यू, Shocking Video
पोलिसांनी या प्रकरणात घातपाताचा संशय नसल्याचं म्हटलं आहे. बुधवारी बँकॉकमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. या प्रकरणी ग्रुपमधील इतर लोकांची चौकशी करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या इमर्जन्सी सर्व्हिसने जवळपास दीड तास सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्नांना यश आले नाही. पोलिसांनी सांगितलं की, पॅट्रिक वार्डच्या अंत्यसंस्कारासाठी दुतावासासोबत आम्ही संपर्कात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.