मराठी बातम्या /बातम्या /विदेश /‘तू पुन्हा वाचणार नाहीस...’; दहशतवाद्यांच्या या धमकीला मलालाचं चोख उत्तर

‘तू पुन्हा वाचणार नाहीस...’; दहशतवाद्यांच्या या धमकीला मलालाचं चोख उत्तर

नोबेल विजेत्या मलाला युसूफजाईला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिली जिवे मारण्याची धमकी; धमकीवर तिनं देखील दिलं जोरदार उत्तर

नोबेल विजेत्या मलाला युसूफजाईला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिली जिवे मारण्याची धमकी; धमकीवर तिनं देखील दिलं जोरदार उत्तर

नोबेल विजेत्या मलाला युसूफजाईला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिली जिवे मारण्याची धमकी; धमकीवर तिनं देखील दिलं जोरदार उत्तर

मुंबई, 19 फेब्रुवारी: नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईला(Malala Yousafzai) दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानातील तालिबानी दहशतवादी संघटनेच्या एहसानुल्लाह एहसा नामक एका व्यक्तीनं ट्विटरद्वारे तिला ही धमकी दिली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे याच संघटनेनं नऊ वर्षांपूर्वी देखील तिला अशाच प्रकारची धमकी दिली होती. मात्र यावेळी “जुनी चूक पुन्हा होणार नाही” असा खळबळजनक दावा त्यानं केला आहे. दरम्यान ही धमकी व्हायरल होताच ट्विटरनं हे अकाउंट डिलिट केलं आहे.

“आपल्या घरी परत ये आपण चर्चा करुन तोडगा काढू शकतो. अन्याथा गेल्या वेळची चूक आम्ही पुन्हा करणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मलाला हिला धमकी देण्यात आली होती. मात्र तिनं देखील या ट्विटला न घाबरता दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “तहरीक-ए-तालिबान यानं माझ्यावर हल्ला केला होता. हा पाकिस्तानचा माजी प्रवक्ता आहे. त्यानं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. तो सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकदा लोकांना घाबरवतोय.” अशा आशयाचं ट्विट करुन हा व्यक्ती सुटलाच कसा? असा रोखठोक सवाल तिनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मलाला युसूफझाईवर 2012 मध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी एहसानुल्लाह एहसानने घेतली होती. एहसानला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. पण फेब्रुवारी 2020 मध्ये तो तुरुंगातून फरार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. एहसानला तीन वर्षे तुरुंगात ठेवणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने पाकिस्तानी माध्यमांना पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये  तुरुंगातून पळून गेल्याबाबत घोषणा केली होती.

अवश्य पाहा - जॅकलिन राहाते प्रियांकाच्या घरात; एका महिन्याचं भाडं ऐकून येईल चक्कर

एहसान यानं 2014 मध्ये पेशावर येथील लष्कराच्या शाळेवर देखील हल्ला केला होता. या हल्ल्यात 134 मुलांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या आरोपावरुन देखील त्याला शिक्षा देण्यात आली होती. एहसान तुरुंगातून फरार झाल्यानंतर त्याने एक मुलाखत दिली होती. त्याने पाकिस्तानी पत्रकारांशी ट्विटर अकाउंटवरुन संवाद साधला होता. ज्यामध्ये त्याने उर्दू भाषेत धमकी दिली होती. एहसानचे अनेक ट्विटर अकाउंट असून ते बंद करण्यात आले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार राउफ हसन यांनी सांगितलं की, “या धमकीबाबत सरकारकडून तपास सुरु आहे. तसंच, आम्ही ट्विटरला हे अकाउंट ताबडतोब बंद करण्यास सांगितले.' दरम्यान, नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबवत होती. याच कारणामुळे तिच्यावर 2012 मध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर तालिबानने एक निवेदन जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसंच मलाला वाचली तर तिला पुन्हा लक्ष्य करु असे सांगितले होते.”

First published:
top videos

    Tags: Crime, International, Social media, Social media viral, Twitter