जॅकलिन राहाते प्रियांकाच्या घरात; एका महिन्याचं भाडं ऐकून येईल चक्कर
जॅकलिन राहाते प्रियांकाच्या घरात; एका महिन्याचं भाडं ऐकून येईल चक्कर
जॅकलिन कुठल्याही सोशल मीडिया पोस्टमुळं नव्हे तर चक्क तिच्या नवा घरामुळं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे कोट्यवधींची मालकीण असतानाही तिनं अभिनेत्री प्रियांका चोप्राचं घर भाडे तत्वावर घेतलं आहे.
मुंबई, 19 फेब्रुवारी: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या ग्लॅमरस अदांमुळं नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओज नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी जॅकलिन कुठल्याही सोशल मीडिया पोस्टमुळं नव्हे तर चक्क तिच्या नवा घरामुळं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे कोट्यवधींची मालकीण असतानाही तिनं अभिनेत्री प्रियांका चोप्राचं घर भाडे तत्वावर घेतलं आहे.
जॅकलिन गेले अनेक महिने जुहू येते फ्लॅट खरेदी करण्याचा प्रयत्न करतेय. परंतु तिला हवा तसा फ्लॅट अद्याप मिळालेला नाही. परिणामी तिनं जुहू येथील कर्मयोग सोसायटीमधील एक फ्लॅट भाड्याने घेतला. हा फ्लॅटचे मालकी हक्क प्रिकांचा चोप्राकडे आहेत. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार या फ्लॅटचं एका महिन्याचं भाडं तब्बल 6 लाख 78 हजार रुपये इतकं आहे. शिवाय तिच्याकडून 12 कोटी रुपयाचं डिपॉझिट देखील घेण्यात आलं. या घरात अनेक सोयीसुविधा आहे. हा एक फुल्ली फर्निश फ्लॅट आहे. शिवाय त्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल, आलिशान जिम, वॉकिंग पार्क, लहान मुलांसाठी गार्डन, अंररग्राऊंट पार्किंग अशा अनेक सुविधा आहेत.
जॅकलिन येत्या काळात ‘भूत पोलिस’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती अभिनेता रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सोबतच तिनं अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची देखील ऑफर स्विकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अक्षयचा लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा चित्रपट पुढच्या वर्षी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.