<strong>नवी दिल्ली.</strong> नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाईने (Nobel Peace Prize laureate Malala Yousafzai) लग्नगाठ बांधली आहे. तिने यूकेमध्ये असर मलिकसह (Asser Malik) निकाह केला आहे. दरम्यान मलालाचे पती असर यांचे पाकिस्तान क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ते एका फ्रँचायझीचे मालकही होते. (फोटो: Twitter/@Malala)
मलिक पाक क्रिकेट बोर्डमध्ये हाय परफॉरमन्स जनरल मॅनेजर आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अनेक क्रिकेट इव्हेंटचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान याबाबत माहिती समोर आलेली नाही की मलाला आणि असर किती काळापासून एकमेकांना ओळखतात. मात्र समोर आलेल्या फोटोंवरुन साधारण 2019 पासून ते एकमेकांना ओळखत असावे… (फोटो: Twitter/@Malala)
असर यांनी इ्न्स्टाग्राम अकाउंटवर 2019 मध्ये बर्मिंगहॅममध्ये क्रिकेट विश्वचषकादरम्यान एक ग्रुप फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये मलालाही त्यांच्यासोबत पाकिस्तान संघाला प्रोत्साहन देताना दिसली होती.
असर यांनी मलालाला फोटोमध्ये टॅग देखील केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी जोडले जाण्यापूर्वी एमेच्योर लीगमध्ये असर यांची महत्त्वाची भूमिका होती.
त्यामुळे क्रिकेटमध्ये त्यांची आवड वाढली. क्रिकइन्फोच्या मते, ते खेळाडू व्यवस्थापन एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि एमेच्योर लीग लास्ट मॅन स्टँडमध्ये एका फ्रँचायझीचे मालक देखील होते.. (फोटो सौजन्य-Twitter/malala)
त्यांनी पाकिस्तान सुपर लीग मुलतान सुलतान संघासोबत ऑपरेशनल मॅनेजर म्हणूनही काम पाहिले आहे. मुलतान सुलतानने या हंगामात विजेतेपदही पटकावले होते…
असर यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, पाकिस्तानमधील तळागाळातील क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे तसेच हौशी खेळाडूंना हार्ड बॉल क्रिकेटचा अनुभव देण्याचे त्यांचे ध्येय आहे.