WHO च्या शास्त्रज्ञांनीच दिला इशारा, लवकरच येणार Corona चा नवा व्हेरिएंट; Omicron पेक्षाही असणार धोकादायक
WHO च्या शास्त्रज्ञांनीच दिला इशारा, लवकरच येणार Corona चा नवा व्हेरिएंट; Omicron पेक्षाही असणार धोकादायक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी सांगितलं की, गेल्या आठवड्यात जगात कोरोनाचे 2.1 कोटी रुग्ण आढळले आहेत, यावरून कोविड-19 ची तिसरी लाट (Covid Third Wave) सध्या किती तीव्र आहे हे दर्शवत आहे.
नवी दिल्ली, 28 जानेवारी: कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉन मुळे (Omicron Cases) जगभरात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी सांगितलं की, गेल्या आठवड्यात जगात कोरोनाचे 2.1 कोटी रुग्ण आढळले आहेत, यावरून कोविड-19 ची तिसरी लाट (Covid Third Wave) सध्या किती तीव्र आहे हे दर्शवत आहे.
जगभरातील संशोधकांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट कोविडचा अंतिम व्हेरिएंट नाही. WHO च्या शास्त्रज्ञांचा असं म्हणणं आहे की कोविड-19 चा आणखी एक व्हेरिएंट जो ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरेल आणि तो लवकरच जगात दिसण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यानं अलीकडेच सांगितले की, Omicron व्यतिरिक्त लवकरच जगात एक व्हेरिएंट दिसू शकतो. पुढे शास्त्रज्ञांनी म्हटलं की, त्याचवेळी हे नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Corona new Variant) पेक्षा खूप वेगानं पसरत आहे.
सोशल मीडियावरील चर्चेदरम्यान WHO च्या वैज्ञानिक मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) यांनी सांगितलं की, कोविड प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, ओमायक्रॉन हे कोविडच्या गेल्या व्हेरिएंटसारखे धोकादायक नव्हते. कोविडचा पुढील व्हेरिएंट यापेक्षाही धोकादायक असू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
मारिया म्हणाल्या की, सध्या संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कोविडचा पुढील व्हेरिएंट कसा रिअॅक्ट आणि तो अधिक प्राणघातक की कमी धोकादायक असेल. त्या म्हणाले की, काळाच्या ओघात कोरोनाची रूपे कमकुवत होतील आणि कमी लोक आजारी पडतील या भ्रमात लोकांनी पडू नये. आम्ही पुढील व्हेरिएंट कमी धोकादायक असण्याची अपेक्षा करू शकतो मात्र याची खात्री देता येत नाही.
WHO च्या शास्त्रज्ञानं सांगितलं की, जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग आहे तोपर्यंत कोविड-19 प्रोटोकॉलचा वापर करावा. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की पुढील आवृत्तीमध्ये लसीपासून स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता देखील असेल आणि ती ओमायक्रॉनपेक्षा जास्त वेगाने प्रसारित केली जाऊ शकते.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.