नवी दिल्ली, 22 डिसेंबर : एखाद्या कठीण प्रसंगी आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण जीवाच्या आकांतानं धडपड करत असतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असतात. एखाद्या अपघातातही कुणी जखमी झालं असेल, तर जीव वाचवण्यासाठी हातपाय हलवत राहतात. याचाच प्रत्यय मादागास्करमध्ये (Madagascar) नुकताच आला. मादागास्करचे एक मंत्री एका हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर सलग 12 तास पोहत होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचला. दिलं आहे. द गार्डियननने दिलेल्या वृत्तानुसार, मादागास्करचे सेक्रेटरी ऑफ पोलीस सर्ज गेल्ले (Surge Gelle) हे त्यांच्या हेलिकॉप्टरमधून सोमवारी (20 डिसेंबर 21) प्रवास करत होते. त्यांच्याबरोबर पोलीस अधिकारीही होते. सर्ज यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) या बेटाच्या ईशान्येकडील किनाऱ्यावर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर 57 वर्षांचे सर्ज तब्बल 12 तास या समुद्राच्या पाण्यात पोहत होते. त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून ते बचावले. या अपघातामागचं (Accident) कारण अजून स्पष्ट झालं नाही अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महाम्बो शहरात सर्ज मंगळवारी पोहोचले. हेलिकॉप्टरमधून कोसळल्यानंतर पोहून सर्ज या शहरात पोहोचू शकले. या हेलिकॉप्टरमधील आणखी दोन प्रवाशांचा शोध अजूनही सुरुच आहे. ‘माझी वेळ आली नव्हती…’अशी प्रतिक्रिया या अपघातातून बचावल्यानंतर सर्ज यांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्ज जास्त जखमी झाले नाहीत. पाण्यात जास्त वेळ राहिल्यानं त्यांना सर्दी झाली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्ज डेकवर एका खुर्चीत त्यांच्या गणवेशातच पडलेले दिसत आहेत.
पत्रकारांशी बोलत होत्या आरोग्यमंत्री, तेवढ्याच पायावर चढली ‘मकडी’; आणि मग…
ईशान्य किनाऱ्यावर एका जहाजाचा अपघात झाला होता. त्या जागेची पाहणी करण्यासाठी सर्ज तिथे गेले होते. या जहाज अपघातात किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्ज यांनी हेलिकॉप्टरच्या सीटचा पोहताना आधार घेतला होता, असं मुख्य पोलीस अधिकारी रॅव्होये यांनी सांगितलं.
66 वर्षांच्या आजोबांना हवी परफेक्ट जोडीदार; तिच्यासाठी रस्त्यावरच लावलं होर्डिंग
सर्ज हे एक उत्तम क्रीडापटू आहेत. त्यांचा स्टॅमिना एखाद्या 30 वर्षांच्या तरुणासारखा आहे. त्यांचं शरीर लोहासारखं आहे. मंत्री झाल्यावरही त्यांनी त्यांचा फिटनेस उत्तम ठेवला आहे, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं, असंही रॅव्होये म्हणाले. सर्ज यांनी जवळपास 30 वर्षं पोलीस खात्यात काम केलं आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रिपदी नियुक्ती झाली. केवळ धाडस केल्यामुळेच सर्ज यांचा इतक्या मोठ्या अपघातातून जीव बचावला हे मात्र खरं.