मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अंतराळातून शेतात पडलेली ती रहस्यमयी वस्तू नेमकी काय? नासाचं उत्तर ऐकून बसेल धक्का

अंतराळातून शेतात पडलेली ती रहस्यमयी वस्तू नेमकी काय? नासाचं उत्तर ऐकून बसेल धक्का

ऑस्ट्रेलियाच्या एका मैदानात अंतराळातून (Space) एक रहस्यमय गोष्ट (Mysterious Object) पडल्याचं सांगितलं आहे. ही वस्तू पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे

ऑस्ट्रेलियाच्या एका मैदानात अंतराळातून (Space) एक रहस्यमय गोष्ट (Mysterious Object) पडल्याचं सांगितलं आहे. ही वस्तू पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे

ऑस्ट्रेलियाच्या एका मैदानात अंतराळातून (Space) एक रहस्यमय गोष्ट (Mysterious Object) पडल्याचं सांगितलं आहे. ही वस्तू पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे

  मुंबई 06 ऑगस्ट : एका शेतात एक रहस्यमय गोष्ट दिसल्याची बातमी न्यूयॉर्क टाईम्समध्ये देण्यात आली आहे. मिक मायनर्स या 48 वर्षांच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतात ही एक गूढ वस्तू दिसली. आधी तो खूप घाबरला. अशा प्रकारचं काहीही आपण आपल्या आयुष्यात याआधी कधीही पाहिलेलं नाही असं मिकनं सांगितलं. त्यानंतर त्यानं या रहस्यमय वस्तूचा फोटो काढला आणि त्याचा एक शेतकरी मित्र जॉक वॅलेस याला तो फोटो पाठवला. जॉकच्या शेतातही अशाच प्रकारची वस्तू आढळली होती. या रहस्यमय वस्तूबद्दल आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.

  ‘या’ टॅटूमुळे कळू शकेल आजार होण्यापूर्वीच शरीराची अवस्था, वाचा नक्की काय आहे विशेष

  अंतराळात अनेक आश्चर्यकारक घटना अनेकदा घटत असतात. हल्ली तंत्रज्ञानामुळे त्या आपल्यापर्यंत पोहोचतातही. ऑस्ट्रेलियात (Australia) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका मैदानात अंतराळातून (Space) एक रहस्यमय गोष्ट (Mysterious Object) पडल्याचं सांगितलं आहे. ही वस्तू पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ही वस्तू अचानक आली कुठून हे प्रत्यक्षदर्शींना समजलं नाही. ही घटना घडली त्या ठिकाणी मिक माइनर्स मेंढ्या चारत होता. त्याला एक तीक्ष्ण, टोकदार अशी काळी वस्तू दिसली. ही वस्तू 9 फूटांपेक्षा जास्त लांब वाटत होती.

  सुरुवातीला त्यांना ते एक जळालेलं झाड किंवा शेतीसाठी वापरलं जाणारं एखादं अवजार आहे असं वाटलं. पण त्यांचा हा अंदाज अगदी चुकीचा निघाला. ही रहस्यमय वस्तू अन्य काही नाही तर स्पेसएक्स(SpaceX) च्या अंतराळयानाचा तुकडा असल्याचं स्पष्ट झालं. अंतराळातून हा तुकडा परत जमिनीवर येऊन पडल्याचं सांगितलं जात आहे.

  Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई

  अंतराळातील कचरा म्हणजे काय?

  अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने (NASA) याबाबतची माहिती घेऊन एक निवेदन केलं आहे. ही रहस्यमय वस्तू गेल्यावर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय स्टेशनमधून क्रू-1 मिशन पूर्ण होताना परतीच्या दरम्यान वापरण्यात आलेल्या ड्रॅगन अंतरिक्ष यान जेटीसन ट्रंक सेगमेंटचा उर्वरित भाग असू शकते , अशी पुष्टी स्पेसएक्सनं (SpaceX) केल्याचं नासानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. याचाच अर्थ हा अंतराळातील कचरा आहे.

  अंतराळातील कचरा म्हणजे अंतराळातील असं उपकरण जे आता काम करत नाही. अंतराळातील बहुतांश कचरा हा वातावरणात परत प्रवेश करताना जळून जातो आणि जो उरतो तो सहसा समुद्रात पडतो. चीनकडून लाँच करण्यात आलेल्या एका यानाचा तुकडा हिंदी महासागरात पडला होता. चीनच्या नियंत्रणाबाहेर गेल्यानं असं झाल्याचं सांगितलं जातं, अशी एक शक्यता आहे. या घटनेदरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही असं सांगण्यात येत आहे.

  First published:

  Tags: Space Centre, Viral news