• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पॉर्न पाहण्यासाठी उडवले तब्बल 1 कोटी; कर्मचाऱ्याने कंपनीच्या क्रेडिट कार्डावर केली मौज

पॉर्न पाहण्यासाठी उडवले तब्बल 1 कोटी; कर्मचाऱ्याने कंपनीच्या क्रेडिट कार्डावर केली मौज

कर्मचाऱ्यांच्या सवयीमुळे कंपनीला मोठा फटका सहन करावा लागत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच अंशी ते खरंही आहे. सध्या एका प्रॉड्युसरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रॉड्युसरने आपल्या सवयीमुळे कंपनीच्या क्रेडिट कार्डावरुन एक कोटी रुपये एडल्ट साइटवर पॉर्न पाहण्यासाठी खर्च केले. प्रॉड्यूसरचं (Documentry Producer) नाव मार्क जोहान असं असून या प्रकरणाचा खुलासा झाल्याच्या अनेक वर्षांनंतरही तो कोर्टात ये-जा करीत आहे. (1 crore of the company blown up by an employee to watch pornographic videos) कंपनीने या प्रकरणात कर्मचाऱ्यावर क्लेम केला आहे. ब्रिटेनची न्यूज वेबसाइट metro.co.uk मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 55 वर्षांचे प्रॉड्यूसर मार्कने एडल्ट शोच्या सवयीमुळे मोठी रक्कम उडवली. जेव्हा या घटनेचा खुलासा झाला, तेवाहा मात्र ते या पैशांचा हिशोब देऊ शकले नाही. यानंतर कंपनीने मार्क विरोधीत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे. याशिवाय मार्कने या गुन्ह्याची कबुलीही ( ऑक्टोबर 2019 ते 2020 नोव्हेंबर) दिली. नुकतच या प्रकरणात लंडन क्राऊन कोर्टात सुनावणी झाली होती. हे ही वाचा-बायकोच्या मृत्यूनंतर घर साफ करताना नवऱ्याला दिसले बॅगेत बंद 3 मुलांचे मृतदेह मार्क त्या दिवसात आपल्या कंपनीच्या लॉजिस्टिक्सचं काम पाहत होते. 2019 मध्ये त्यांना कंपनीने एक क्रेडिट कार्ड दिलं होतं. मार्कने याचा उपयोग आपल्या सवयींसाठी केला. यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. मार्कने कंपनीच्या क्रेडिट कार्डातून तब्बल 1 कोटी रुपये एडल्ट शो पाहण्यासाठी खर्च केले. कंपनीच्या ऑडिटर्सला संशय आल्यानंतर त्यांनी 1 कोटींचा हिशोब मागितला. मात्र मार्क याचा हिशोब देऊ शकला नाही. त्यानंतर कंपनीने इंटरनल तपास सुरू केला. 2020 मध्ये मार्कने कंपनी सोडली, मात्र त्याच्याविरोधात केस सुरूच होती. शेवटी मार्कने आपल्या जबाबात केलेल्या कृत्याबाबत माफी मागितली. कोर्टाने मार्क याचा जबाब ऐकून घेतल्यानंतर त्याला एक वर्षांचा तुरुंगवास सुनावला.

  Published by:Meenal Gangurde
  First published: