इस्वातिनी, 02 डिसेंबर : जगात नेहमी काही ना काही विचित्र घडत असते. असाच एक आफ्रिका खंडातील देश इस्वातिनी. हा देश ओळखला जातो तो अंधश्रध्दा आणि विचित्र प्रथांसाठी. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमधील हा देश त्याच्या गरीबीसाठीही जगात प्रसिद्ध आहे. इस्वातिनी हा देश जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असून, येथील सुमारे 60 टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. दरम्यान, या देशात अजूनही राजाची राजवट आहे. सध्या इथे मस्वति-3 (Mswati III) या राजाचे राज्य आहे. देशाला भिकेचे डोहाळे लागले असले तरी, राजाचे मात्र वेगळेच शौक आहेत. या देशाचा राजा त्याच्या विलासी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. कहर म्हणजे देशाची परिस्थिती खराब झाली असताना, या रादानं आपल्या 15 पत्नींसाठी तब्बल 127 कोटी रुपयांच्या महागड्या गाड्या विकत घेतल्या आहेत. वाचा- अरेरे! लाईव्ह सामन्यात थोडक्यात बचावला स्मिथ, नाही तर घशात गेली असती बत्तीशी इस्वातिनी देशात सध्या अशी परिस्थिती आहे की लोकांना खाण्यासाठी अन्न नाही, कारण कोणाकडे पैसे नाहीत. मात्र राजाचे आपल्या पत्नींवर भारी प्रेम. पत्नींवरच्या प्रेमापोटी राजा मस्वति-3ने नुकतेच 127 कोटी रुपये गाडी घेण्यावर खर्च केले. या राजानं चक्क आपल्या15 पत्नींसाठी 15 रोल्स रॉयसेस आणि डझनभर बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या आहेत. या गोष्टीमुळे आता सामान्य जनता राजाचा विरोध करत आहे. वाचा- नियमांची ‘ऐशी तैशी’! भररस्त्यात बंदूक घेऊन तरुणांनी केला डिस्को, VIDEO VIRAL
वाचा- कार्तिक आर्यनला पकडावे लागले दीपिकाचे पाय, असं झालं तरी काय; पाहा VIDEO मुख्य गोष्ट म्हणजे या राजाची स्वतःची एकूण संपत्ती 1 हजार 434 कोटी आहे. या राजाचे इस्वातिनीमध्येच एक खासगी विमान तसेच स्वतःचे विमानतळ आहे. मस्वति-3 1986 पासून राजाच्या पदावर बसला आहे. हा राजा विवादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिली वेळ नाही, याआधी या राजानं 1 हजार 841 कोटी रुपये खर्च करून लक्झरी जेट खरेदी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. त्यामुळं जगभरात या राजाची चर्चा ही वादग्रस्त गोष्टींसाठी केली जाते. इस्वातिनी हा देश ओळखला जातो तो टॉपलेस तरुणींच्या परेडसाठी. ही परेड जगभरात चर्चीली जाते, यात मुख्य म्हणजे प्रत्येक वर्षी राजा स्वत: साठी नवीन पत्नीची निवड करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मुली या परेडमध्ये येत नाहीत त्यांना शिक्षा केली जाते.