मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ना कोरोना, ना कसला व्हायरस तरी किम जोंगने शहर केलं लॉकडाऊन, सैनिकांच्या चुकीचा नागरिकांना फटका

ना कोरोना, ना कसला व्हायरस तरी किम जोंगने शहर केलं लॉकडाऊन, सैनिकांच्या चुकीचा नागरिकांना फटका

सर्व ६५३ गोळ्या सापडेपर्यंत शहर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. असॉल्ट रायफलच्या गोळ्या ७ मार्च रोजी हरवल्या होत्या.

सर्व ६५३ गोळ्या सापडेपर्यंत शहर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. असॉल्ट रायफलच्या गोळ्या ७ मार्च रोजी हरवल्या होत्या.

सर्व ६५३ गोळ्या सापडेपर्यंत शहर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. असॉल्ट रायफलच्या गोळ्या ७ मार्च रोजी हरवल्या होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्योंगयांग, 28 मार्च : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच चित्रविचित्र निर्णय आणि फतव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी जबरदस्तीने २ लाखांहून लोकांना लॉकडाऊनमध्ये ठेवल्याचं म्हटलं जातंय. उत्तर कोरियातील शहर हेसन लॉकडाऊन करण्याचे आदेश किम जोंग यांनी दिलेत. उत्तर कोरियात कोरोना किंवा इतर कोणता व्हायरस हे या लॉकडाऊनचं कारण नाहीय. तर यामागचं कारण कोरियाच्या लष्करातील सैनिकांकडून बंदुकीच्या हरवलेल्या ६५३ गोळ्या आहेत.

रेडिओ फ्री एशियाने सांगितले की, लष्कर परत येत असताना या गोळ्या हरवल्याचं आढळलं. यानंतर किम जोंग उनने अधिकाऱ्यांना पूर्ण शहरात गोळ्या शोधण्यास सांगितलं. त्यानंतर आदेश देण्यात आला की जोपर्यंत गोळ्या सापडत नाहीत तोपर्यंत शहर लॉकडाऊन राहील.

अचानक बसने पेट घेतला आणि 20 जणांचा जागीच मृत्यू, भीषण अपघाताचा हादरवणारा VIDEO 

रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असं सांगण्यात आलंय की, हेसन शहरातील नागरिकाने म्हटलं की, सर्व ६५३ गोळ्या सापडेपर्यंत शहर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. असॉल्ट रायफलच्या गोळ्या ७ मार्च रोजी हरवल्या होत्या. २५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत लष्कर परतले होते. लष्कर परतण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र या प्रक्रियेवेळी गोळ्या हरवल्यानं आता चौकशी सुरू आहे.

लष्कर परत येताना सैनिकांना गोळ्या हरवल्याचं लक्षात आलं. याची माहिती देण्याऐवजी लष्कराच्या सैनिकांनी स्वत:च शोध सुरू केला. गोळ्या सापडत नाहीत हे लक्षात येताच अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली गेली. त्यानंतर शहर लॉकडाऊन करण्यात आलं. गेल्या आठवड्यात कारखाने, शेत, सामाजिक क्षेत्र, चेकपॉइंट नाके इत्यादी ठिकाणी गोळ्या शोधण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Kim jong un