जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कमला हॅरिस यांनी हस्तांदोलन केल्यावर हात पुसण्याची कृती म्हणजे Germaphobia आहे?

कमला हॅरिस यांनी हस्तांदोलन केल्यावर हात पुसण्याची कृती म्हणजे Germaphobia आहे?

कमला हॅरिस यांनी हस्तांदोलन केल्यावर हात पुसण्याची कृती म्हणजे Germaphobia आहे?

न्यूयॉर्क, 25 मे: अमेरिकेच्या (USA) उपाध्यक्ष (Vice President) कमला हॅरिसचा (Kamala Harris) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या दक्षिण कोरियाचे (South Korea) राष्ट्राध्यक्ष (President) मून जे इन (Moon Je In) यांच्याशी हस्तांदोलन (HandShek) केल्यानंतर आपले हात पुसताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीवरून गदारोळ माजला असून, काहींनी त्यांच्यावर वर्णद्वेषाची टीका केली आहे, तर काहींनी त्यांना जर्मोफोबिया (Germaphobia) असल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात जर्मोफोबिया असलेले अनेक लोक आढळत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    न्यूयॉर्क, 25 मे: अमेरिकेच्या (USA) उपाध्यक्ष (Vice President) कमला हॅरिसचा (Kamala Harris) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या दक्षिण कोरियाचे (South Korea) राष्ट्राध्यक्ष (President) मून जे इन (Moon Je In) यांच्याशी हस्तांदोलन (HandShek) केल्यानंतर आपले हात पुसताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीवरून गदारोळ माजला असून, काहींनी त्यांच्यावर वर्णद्वेषाची टीका केली आहे, तर काहींनी त्यांना जर्मोफोबिया (Germaphobia) असल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात जर्मोफोबिया असलेले अनेक लोक आढळत आहेत. फोबिया म्हणजे काय? प्रत्येकाला कसली न कसलीतरी भीती (Fear) असते. या भीतीचं नेमकं कारण ते सांगू शकत नाहीत. काही लोकांना पाण्याची भीती वाटते तर काहींना किडे, कीटक यांची भीती वाटते. काहींना बंदिस्त जागेची जसं विमान, गाडी, एसी खोल्या यांची भीती वाटते. हे वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया (phobia) आहेत. असाच एका फोबिया आहेजर्मोफोबिया. यामध्ये लोकांना जंतूची भीती वाटू लागते. आपण कुठेही स्पर्श केला तर आपल्या शरीरात धोकादायक जंतू येतील, असं त्यांना वाटतं. जर्मोफोबिया : धूळ, घाण यापासून लांब राहिल्यानं आपल्याला निरोगी आयुष्य मिळतं, परंतु काही लोकांना स्वच्छतेची इतकी सवय असते की त्यांच्या मनात धूळ आणि जंतू यांची भीती निर्माण होते. याला जर्मोफोबिया (Germaphobia) किंवा मायसोफोबिया देखील (Mysophobia) म्हणतात. हा आजार असणाऱ्या व्यक्तीला थोडीशी धूळ असली तरी भीती वाटते. श्वास घ्यायला त्रास होणं, हृदयाची धडधड वाढणं, थरथर असे त्रास होतात. सत्ता सोडता सोडवेना, ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी पराभूत होताच ठोकलं संसदेला टाळ प्रत्येक गोष्टीची भीती वाटते : असे लोक अगदी स्वच्छ ठिकाण असलं तरीही किंवा अन्नामध्ये देखील विषाणू, बुरशी, बॅक्टेरिया असल्याची कल्पना करू लागतात आणि खाणं किंवा कोणालाही स्पर्श करण्यास घाबरू लागतात. लोकांशी हस्तांदोलन करणं, मिठी मारण्याची देखील त्यांना भीती वाटते. कोणाशी साधं हस्तांदोलन केलं तरी आपल्या शरीरात जंतू येतील, अशी भीती त्यांना वाटते. कोरोना काळात जर्मोफोबिया सर्रास : कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Infection) झालेली व्यक्ती निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आली तर निरोगी व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी मान्य केलं आहे. त्यामुळं 2020च्या सुरूवाती पासूनच, हस्तांदोलन करण्यासारख्या गोष्टी कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळं आता अभिवादन करण्यासाठी हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय पद्धतीनं नमस्ते किंवा इतर पर्याय वापरले जाऊ लागले आहेत. जर्मोफोबियाची कारणे अनेक : एक दुःखद घटनेचा तीव्र धक्का बसलेली व्यक्ती अचानक स्वच्छतेबाबत अती चिंता करू लागते. हळूहळू तिची ही सवय वाढत जाते आणि ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीत जंतू असल्याची कल्पना करायला लागते. ओब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी-OCD) म्हणजेच वारंवार साफसफाई करण्याची सवय असलेले लोक जर्मोफोबियाचे बळी ठरू शकतात. विशेष लक्षणे : अशा व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतात. हस्तांदोलन किंवा कोणत्याही प्रकारचा स्पर्श त्यांना आवडत नाही. त्यांना त्यांच्या गोष्टी इतरांना वापरायला देणं आवडत नाही. या व्यक्ती सतत आपले हात धुतात किंवा घराची स्वच्छता करतात. साफ सफाईपुढे त्यांची महत्त्वाची कामं देखील मागं पडतात. समुपदेशन आणि औषधं यांनी उपचार शक्य : या आजारावर ठराविक असा एक उपचार नाही. बर्‍याच प्रकारचे उपचार एकत्रितपणे केले जातात. अनेकदा औषधे दिली जातात मात्र त्याचवेळी विशेष तज्ज्ञ रूग्णाशी बोलतात, त्याचं समुपदेशन (Counselling) करतात. ज्यामुळं या समस्येच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी उपाय करता येईल. कधीकधी अँटी डिप्रेशनची औषधंही दिली जातात. एक्सपोजर थेरपीदेखील मदत करते : भीती संपवण्याचा एक मार्ग म्हणजे रुग्णाला ज्याची भीती वाटते त्याच्याच संपर्कात त्याला आणणं. याला एक्सपोजर थेरपी (Exposure Therapy) म्हणतात. यामध्ये रुग्णाला थेट धूळ किंवा घाणीत सोडलं जात नाही, तर त्या भीतीपोटी केलेल्या कामांमधील अंतर वाढवण्यास सांगितलं जातं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दर 15 मिनिटांनी साबणानं हात धूत असेल, तर हा वेळ अर्धा तास आणि नंतर एक तासापर्यंत वाढवण्यास सांगितलं जातं. यामुळे भीती हळूहळू कमी होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात