मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

BREAKING : दोन पत्रकारांना नोबेल पारितोषिक जाहीर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या योगदानाचा गौरव

BREAKING : दोन पत्रकारांना नोबेल पारितोषिक जाहीर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या योगदानाचा गौरव

 जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी रेसा आणि मुरातव यांच्या (Journalists Maria Ressa and Dmitry Muratov have won the Nobel Peace Prize) नावाची घोषणा करण्यात आली आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 8 ऑक्टोबर : जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी रेसा आणि मुरातव यांच्या (Journalists Maria Ressa and Dmitry Muratov have won the Nobel Peace Prize) नावाची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी ही जगासाठी आदर्शवत असून सध्याच्या हरवत चाललेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या (Work for democracy and freedom of speech) काळात अत्यंत प्रेरणादायी असल्याचं नोबेल पुरस्कार समितीनं म्हटलं आहे.

या कामगिरीसाठी झाला गौरव

रेसा आणि मुरातव यांनी फिलिफिन्स आणि रशिया या देशांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे जगासमोर येणं गरजेचं असून या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. जगातील ज्या भागात सध्या लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, अशा भागात या दोघांनी केलेली कामगिरी ही जिगरबाज ठरली आहे.

हे वाचा - चीनच्या समुद्रात USच्या आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, चर्चांना उधाण

दोघांना मिळणार भरघोस बक्षीस

या दोघांना नोबेल पुरस्कारासोबत 11 लाख डॉलर, म्हणजेच सुमारे 8 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या पुरस्कारासाठी एकूण 139 जणांची नावं चर्चेत होती. त्यातून या दोघांच्या नावाची अंतिम निवड करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती किंवा संस्था ज्यांचं कार्य समाजाच्या उन्नतीसाठी किंवा विकासासाठी मूलभूत आणि प्रेरणादायी काम करतं, अशा घटकांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो.

First published:

Tags: Nobel