जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / भारताची टिंगल करण्याऐवजी...ओबामा यांच्या वक्तव्यावर संतापले जॉनी मूर

भारताची टिंगल करण्याऐवजी...ओबामा यांच्या वक्तव्यावर संतापले जॉनी मूर

ओबामा यांच्या वक्तव्यानंतर संतापले मूर

ओबामा यांच्या वक्तव्यानंतर संतापले मूर

यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमचे (यूएससीआयआरएफ) माजी आयुक्त जॉनी मूर सध्या जगभरात चर्चेत आले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली: यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमचे (यूएससीआयआरएफ) माजी आयुक्त जॉनी मूर सध्या जगभरात चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जगभरातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांना बोलताना बराक ओबामा यांच्यावरही टीका केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतावर टीका करण्यापेक्षा भारतातील अनेक गोष्ट पाहून त्यांतून चांगल्या गोष्टी घेण्यावर आपली ऊर्जा खर्च करावी. ‘माझ्या मते बराक ओबामा यांनी भारतावर टीका करण्यापेक्षा भारताची स्तुती करण्यात अधिक ऊर्जा खर्च करावी असं मला वाटतं. भारत हा मानवी इतिहासातील सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे. भारत US सारखा परिपूर्ण नसला तरी तिथे वैविध्य आहे. अनेक भाषा, प्रांत, जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहात आहेत. प्रत्येक संधी मिळाल्यावर आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे कौतुक केले पाहिजे असंही बोलताना मूर म्हणाले.

जाहिरात

अमेरिका देशानं भारताकडून अनेक गोष्टी शिकायला हव्यात. संपूर्ण जगात सर्वात जास्त वैविध्यपूर्ण असलेला देश भारत आबे. इथे प्रत्येक धर्माची प्रयोगशाळा आहे. मी धर्मांबद्दल जाणून घेण्यासाठी भारतात आलो होतो. तेव्हा काही उल्लेखनीय गोष्टी, भाषा, जेवण आणि राहणीमान यातील वैविध्य यासोबत वेगवेगळ्या धर्माचे लोक भेटले. ज्या गोष्टीची संधी मिळते त्याचा आनंद साजरा करायला हवा असंही ते म्हणाले. यूएससीआयआरएफचे माजी आयुक्त म्हणाले, “मला वाटतं की बरेच लोक भारताबाहेरून भारत पाहात आहेत. जेव्हा तुम्ही भारतात राहता अनुभव घेता तेव्हा तुम्हाला चटकन लक्षात येते की देशाची विविधता हीच त्याची ताकद आहे. जेव्हा तुम्ही भारतातील अल्पसंख्यांकांबद्दल बोलता तेव्हा मी धर्मशाळेत जाऊन तिबेटी समुदायासोबत राहिलो आहे. मी अमृतसरला जाऊन शीख समाजासोबतही माझा काही वेळ घालवला आहे. मी ख्रिश्चन समुदायातील लोकांना तर मी जवळून पाहिलं आहे. मी आखाती देशांमध्ये बराच वेळ घालवला आहे. इजिप्तच्या राष्ट्रपतींनी रेड कार्पेटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. जगाला हाच एक मोठा त्यातून संदेश मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

हे दृश्यं खूप खास तर होतंच पण शक्तीशाली देखील होतं असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण जगभरात त्यांना एक वेगळ्या आणि खास प्रकारे आदर दिला जातो. जगभरात अनेक हस्तक आहेत, मोठ्या प्रमाणावर राजकीय शक्ती आहेत, ज्यांना धर्मांमध्ये फूट पाडायची आहे, समुदायांमध्ये फूट पाडायची आहे आणि भाषांमध्ये फूट पाडायची आहे. पंतप्रधान मोदींच्या भारत ते अमेरिका आणि थेट इजिप्त या प्रवासाचा संदेश असा आहे की राजकारण आणि विभाजनापेक्षा काहीतरी अधिक शक्तिशाली आहे आणि ते मूल्य आहे. त्यामुळे ही भेट राजकीय आणि त्यापेक्षाही जास्त जगात संदेश देणारी महत्त्वाची आहे असं ते म्हणाले.

जाहिरात

22 जून रोजी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ओबामा म्हणाले होते की, जर भारताने ‘जातीय अल्पसंख्याकांच्या’ अधिकारांचे रक्षण केले नाही, तर देशाचे विघटन होण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान मोदींना भेटले तर त्यांनी हिंदूबहुल भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा उल्लेख करावा." जर त्यांच्या अधिकारांचं संरक्षण केलं नाही तर मात्र भारताचे तुकडे होण्यासाठी वेळ लागणार नाहीत आता नाही तर पुढे होतील असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या यूएस दौऱ्यावर जॉनी मूर म्हणातात की ‘ही भेट केवळ भारतासाठी इतिहासाचा भाग नव्हती, तर ती अमेरिकेच्या इतिहासातलीच एक खास गोष्ट आहे. भारताता लोकशाहीसाठी निवडणूक लढवली जाते. अजूनही भारतात लोकशाही जिंवतं आहे याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. पीएम मोदी यांनी इथे येऊन डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांना एकत्र आणले, हीच लोकशाहीची जादू आहे.

जाहिरात

ओबामा यांच्या वक्तव्यावर भारतातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. ओबामांचे विधान आश्चर्यकारक असल्याचे सांगत सीतारामन म्हणाल्या की, ते सत्तेत असताना सहा मुस्लिमबहुल देशांना अमेरिकेच्या ‘बॉम्बहल्ला’चा सामना करावा लागला होता. सीतारामन म्हणाल्या होत्या की, 13 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे सर्वोच्च सन्मान दिले आहेत, त्यापैकी सहा मुस्लिम बहुल देश आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Modi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात