जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / हे Dream आहे की Job? 14 दिवसांची नोकरी, 9 लाख रुपये पगार!

हे Dream आहे की Job? 14 दिवसांची नोकरी, 9 लाख रुपये पगार!

हे Dream आहे की Job? 14 दिवसांची नोकरी, 9 लाख रुपये पगार!

केवळ 14 दिवसांची नोकरी करून 9 लाख रुपयांचा पगार मिळवण्याची (Job opportunity to earn 9 lakh in mere 14 days job) संधी उपलब्ध झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

एडिंबर्ग, 15 नोव्हेंबर: केवळ 14 दिवसांची नोकरी करून 9 लाख रुपयांचा पगार मिळवण्याची (Job opportunity to earn 9 lakh in mere 14 days job) संधी उपलब्ध झाली आहे. भारतात जी व्यक्ती वर्षाकाळी 9 ते 10 लाख कमावते, ती अगदी आरामात आपलं आयुष्य घालवू शकते. मात्र हेच 9 लाख रुपये जर केवळ 14 दिवसांत मिळणार असतील तर? ही काही केवळ कल्पना नाही. प्रत्यक्षात अशी एक नोकरी उपलब्ध (Job advertise published in papers) आहे आणि त्याची रितसर जाहीरातदेखील प्रसिद्ध झाली आहे. काय आहे नोकरी? ही नोकरी आहे ब्रिटनमधील एडिंबर्गमध्ये. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीसाठी ही नोकरी असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे काम आहे नॅनी या पदासाठी. मुलांना सांभाळण्यासाठी एका नॅनीची गरज असल्याचं कुटुंबीयांनी जाहीर केलं आहे. मात्र हा काळ नेमका ख्रिसमसचा असल्यामुळे नॅनी मिळणं कठीण आहे. त्यासाठीच ही भल्यामोठ्या पगाराची ऑफर देण्यात आली आहे. मुलांचा करावा लागणार सांभाळ या कुटुंबाला जुळी मुलं असून ही नोकरी करणाऱ्या नॅनीला त्यांचा 14 दिवस पूर्ण सांभाळ करावा लागणार आहे. या काळात तिला घरी जाता येणार नाही. ख्रिसमसच्या दिवशीदेखील तिला नोकरीवरच थांबावं लागेल आणि मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. मुलांना अंघोळ घालणे त्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांच्यासोबत खेळणे अशी कामं नॅनीला करावी लागणार आहे. हे वाचा-  GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश मिळणार भरमसाठ पगार या कामासाठी दर दिवशी हे कुटूंब 600 युरो म्हणजेच 59 हजार रुपये वेतन द्यायला तयार आहे. याचाच अर्थ 14 दिवसांच्या नोकरीनंतर त्या व्यक्तीला 9 लाख रुपये मिळणार आहे. त्याशिवाय नॅनीच्या येण्याजाण्याचा प्रवासखर्चदेखील हे कुटूंबच करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: britain , career , job
  • First Published :
जाहिरात
जाहिरात