मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जपानच्या क्रुझला 'कोरोना'चा विळखा; शेकडो भारतीयही अडकले

जपानच्या क्रुझला 'कोरोना'चा विळखा; शेकडो भारतीयही अडकले

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जपानच्या (Japan) किनारपट्टीवर क्रुझ डायमंड प्रिसेंसला (cruise Diamond Princess)  वेगळं ठेवण्यात आलं आहे. यात अनेक भारतीय क्रू आणि काही भारतीय प्रवासी आहेत.

  • Published by:  Priya Lad
टोकियो, 8 फेब्रुवारी : चीनमध्ये (China) कोरनाव्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत 722 जणांचा बळी घेतला आहे. इतर देशातील अनेक नागरिक चीनमध्ये अडकले आहेत. त्यांना चीनमधून बाहेर काढण्यासाठी या देशांचे प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना भारताने विशेष विमानाने परत आणलं. मात्र जपानमधील योकोहामा पोर्टवर एका लक्झरी क्रुझवर कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत आणि या क्रुझवर भारतीयदेखील आहेत. कोरोनाव्हायरसमुळे जपानच्या किनारपट्टीवर या जहाजाला वेगळं ठेवण्यात आलं. ज्यामध्ये कोरोनाव्हायरसचे 64 रुग्ण आढळून आलेत. प्रवाशी आणि क्रू मेंबर्स असे एकत्र 3,700 पेक्षा जास्त लोकं या क्रुझवर आहेत. यामध्ये 200 पेक्षा जास्त भारतीय असल्याचं सांगितलं जातं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  या क्रुझवरील कोणत्याही भारतीयाला कोरोनाव्हारसची लागण झालेली नाही. शिवाय या संपूर्ण घटनेवर ते लक्ष ठेवून आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. एस. जयशकंर यांनी ट्विट केलं आहे की, “कोरोनाव्हायरसमुळे जपानच्या किनारपट्टीवर क्रुझ डायमंड प्रिसेंस वेगळं ठेवण्यात आलं आहे. यात अनेक भारतीय क्रू आणि काही भारतीय प्रवासी आहेत. भारतीय दूतावासाने दिलेल्या नव्या माहितीनुसार कोणालाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही. आम्ही या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहोत” कोरोनाव्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 722 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 34,500 पेक्षा जास्त झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 6.101 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 27,657 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचा संशय आहे. 2,050 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे. चीनशिवाय भारतासह 27 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं समोर आली आहेत.
अन्य बातम्या CORONA रुग्णाच्या शेजारी केवळ 15 सेंकद उभा होता हा व्यक्ती, आता परिस्थिती गंभीर
First published:

Tags: Coronavirus, Health

पुढील बातम्या