मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

CORONA रुग्णाच्या शेजारी केवळ 15 सेंकद उभा होता हा व्यक्ती, आता परिस्थिती गंभीर

CORONA रुग्णाच्या शेजारी केवळ 15 सेंकद उभा होता हा व्यक्ती, आता परिस्थिती गंभीर

स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घातला नव्हता

स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घातला नव्हता

स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घातला नव्हता

  • Published by:  Meenal Gangurde
बीजिंग, 8 फेब्रुवारी : चीनमधील कोरोना व्हायरसचा (coronavirus) कहर अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत या आजारामुळे तब्बल 568 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि हजारोंच्या संख्येने लोक पीडित आहेत. हुबेई प्रांतातील वुहान या भागात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील एक व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेजवळ केवळ 15 सेंकद उभा होता. आणि केवळ 15 सेंकदात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या कोरोना व्हायरसच्या रुग्णाची ओळख उघड करण्यात आलेली नाही. स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घातला नव्हता. सध्या या रुग्णावर उपचार सुरू आहेत. हा पीडित चीनमधील निगंबो शहरात राहणारा आहे. हा रुग्ण आणखी किती लोकांच्या संपर्कात आला आहे, याचा तपास सुरू आहे. चीनमध्ये साथीच्या आजाराचं रुप घेतलेल्या कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी 73 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढला असून 637 पर्यंत पोहोचला आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 31,000 पर्यंत पोहोचली आहे. यादरम्यान चीनमधील कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देणाऱ्या चिकित्सकाच्या मृत्यूमुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. काय आहेत लक्षणं कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा. चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांतील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये हजारो लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बातचीत केली आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
First published:

Tags: China, Coronavirus, Death

पुढील बातम्या