रोम, 16 मार्च : चीननंतर (China) इटलीमध्ये (Italy) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) सर्वाधिक लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. इटलीमध्ये कोरोनाव्हायरसने किती कहर केला आहे, याचं भीषण वास्तव तुम्हाला हे वृत्तपत्र (Newspaper) पाहिल्यानंतर समजेल. कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन असलेल्या इटलीतील नागरिकांच्या घरी रविवारी आलेलं हे वृत्तपत्रं. या वृत्तपत्राच्या निम्म्यापेक्षा अधिक पानांवर शोकसंदेश आणि मृत्यूलेखच पाहायला मिळतील. अनेक लोकांनी सोशल मीडियावर या वृत्तपत्राचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.
Bergamo daily newspaper pic.twitter.com/N3ECABz8dr
— David Carretta (@davcarretta) March 14, 2020
इटलीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे इतके मृत्यू झालेत की देशातील प्रमुख वृत्तपत्रात तब्बल 10 पानांवर शोकसंदेश छापलेले आहेत. फक्त रविवारीच या देशात व्हायरसने तब्बल 368 रुग्णांचा बळी घेतला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 1,809 झाली आहे. 24,747 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.
Graphs are useful but to really get what that rising curve is, have a look at the obituaries page of this Bergamo daily newspaper, comparing one from February with one from now pic.twitter.com/78mgZseyVt
— Ben Phillips (@benphillips76) March 14, 2020
इटली युरोपमधील असा देश आहे, जिथं तरुणांच्या तुलनेत वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे. इटलीतील 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा वर आहे, तर 23 टक्के लोकसंख्या 65 वर्षापेक्षा जास्त आहे. कोरोनाव्हायरस 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे इटलीमध्ये जास्त लोकांचा मृत्यू होतो आहे. हे वाचा - केरळनंतर राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, ‘कोरोना’वरील उपचाराचं जयपूर मॉडेल