मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबानची उघड धमकी! 'भारतानं अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवले तर...'

तालिबानची उघड धमकी! 'भारतानं अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवले तर...'

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच भागात तालिबाननं (Taliban) वेगानं वर्चस्व निर्माण केलं आहे. या दहशतवादी संघटनेनं आता भारताला धमकी दिली आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच भागात तालिबाननं (Taliban) वेगानं वर्चस्व निर्माण केलं आहे. या दहशतवादी संघटनेनं आता भारताला धमकी दिली आहे. भारतानं अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असं तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. अफगाणिस्तानमधील ढासळती परिस्थिती हा सध्या साऱ्या जगाचा चिंतेचा विषय बनली आहे. अमेरिका, ब्रिटन, रशियासह अनेक देश या परिस्थितीवर सतत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडावे अशी सूचना भारत सरकारनं केली आहे.

तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीननं 'एएनआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं तर चांगलं असेल असं मला वाटत नाही. अन्य देशांच्या सैन्याची अफगाणिस्तानमध्ये काय अवस्था झाली आहे हे त्यांनी पाहिलं आहे. हे सर्व खुल्या पुस्तकासारखं आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानातील मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमधील जवळपास 34 राज्याच्या राजधानीचे शहरं तालिबान दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले आहेत. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारतानं केलेल्या मदतीबद्दल तालिबाननं आभार मानले आहेत. 'धरण, नॅशनल प्रोजेक्ट्स, पायाभूत सूविधा यासह अफगाणिस्तानच्या विकासासाठी त्याच्या नवनिर्मितीसाठी, आर्थिक समृद्धीसाठी भारतानं केलेल्या कामाबाबद्दल तालिबान आभारी आहे.' असे शाहीन यावेळी म्हणाला.  पक्तिया राज्यातील गुरुद्वारावरील झेंडा शीख समुदायानंच हटवला असल्याचा दावा त्यानं तालिबानच्यावतीनं केला आहे.

अमेरिका (US Army) आणि नाटोचं लष्कर (NATO) जोपर्यंत अफगाणिस्तानात होतं तोपर्यंत शांतता होती आणि तालिबानला खूप मोठा पल्ला गाठता आला नाही. पण हे सैन्य निघून गेल्यानंतर तालिबानने (Taliban Terror) प्रचंड दहशत माजवत शुक्रवारी देशातलं दुसरं मोठं शहर कंदाहारवर कब्जा मिळवला असं वृत्त वृत्तसंस्था एएफपीने दिलं आहे. आता तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे.

तालिबान नियंत्रित भागातून 3 भारतीय अभियंत्यांची सुटका; भारतीय दूतावासानं केलं एअरलिफ्ट

तालिबानने आतापर्यंत जरांज, शेबरगान, सर-ए-पुल, कुंदुज, तालोकान, ऐबक, फराह, पुल ए खुमारी, बदख्शां, गजनी, हेरात, कंदाहार या राज्यांच्या राजधानीच्या शहरांवर (State Capitals) कब्जा केला आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban