जेरुसलेम, 28 जुलै : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मोठा मुलगा Yair यांनी हिंदूची क्षमा मागितली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मुलाने हिंदूच्या भावना दुखावणारं ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर काही भारतीयांनी यावर राग व्यक्त केला. रविवारी Yair यांनी ट्विटरवर हिंदूंची देवी दुर्गा यांची एक प्रतिमा ट्विट केली. यामध्ये देवी दुर्गा यांच्या चेहऱ्याऐवजी लिएट बेन एरी यांचा चेहरा होता. एरी बेंजामिन नेत्यानाहू यांच्यावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात Prosecutor आहेत. हे वाचा- COVID-19: औषध नसतांनाही तब्बल 1 कोटी लोकांनी केली ‘कोरोना’वर मात 29 वर्षीय येर हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. आणि नेहमीच आपल्या वडिलांच्या कामाचं कौतुक करतात. त्यांनी हे ट्विट केल्यानंतर लोकांनी राग व्यक्त केला. त्यानंतर येर यांनी ट्विट डिलिट करीत माफी मागितली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की – मी एका पेजवरुन एक मीम ट्विट केलं होतं. जो इस्त्रायलच्या प्रसिद्ध व्यक्तींवर टीका करणारं होतं. हे हिंदूच्या आस्थेसंबंधित असल्याचं मला माहीत नव्हतं. माझ्या सर्व भारतीय मित्रांची प्रतिक्रिया आल्यानंतर मला याबाबत माहीत झालं. मला जसं कळतं तसं मी ट्विट डिलिट केलं..मला माफ करा.. नेत्यानाहू यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये भ्रष्टाचाराबरोबरच फसवणूक, लाच घेणे यासांरखेही आरोप आहेत. मात्र नेत्यानाहू यांनी सर्व आरोप खोटे असून फेटाळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.