

जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. सर्व जगभर बाधितांची संख्या वाढत आहे. अशा भयग्रस्त वातावरणात दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.


औषध नसतांनाही जगात काही हजार नाही तर तब्बल 1 कोटी लोक कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत.


या बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये भारतातल्या रुग्णांची संख्या मोठी असून देशात 9 लाख 50 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे.


या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.


अमेरिकेत सगळ्यात जास्त लोक रिकव्हर झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या तिथे 20 लाखांपेक्षा जास्त आहे. पण जगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णही अमेरिकेतच आहेत.


जगात ज्या देशांचा रिकव्हरी रेट उत्तम आहे अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताची टक्केवारी ही 64.25 एवढी आहे.


जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे.


जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.