मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ला, सैनिकी तळांवर विमानातून बॉम्बवर्षाव

इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ला, सैनिकी तळांवर विमानातून बॉम्बवर्षाव

इस्रायलने (Israel) हमासवर (Hamas) विमानातून जोरदार बॉम्बवर्षाव (Air bomb attack) करत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्रायलने (Israel) हमासवर (Hamas) विमानातून जोरदार बॉम्बवर्षाव (Air bomb attack) करत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्रायलने (Israel) हमासवर (Hamas) विमानातून जोरदार बॉम्बवर्षाव (Air bomb attack) करत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  desk news

तेल अविव, 12 सप्टेंबर : इस्रायलने (Israel) हमासवर (Hamas) विमानातून जोरदार बॉम्बवर्षाव (Air bomb attack) करत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील (Gaza stripe) हमासच्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं आहे. हमासकडून चालवण्यात येणाऱ्या सैनिकी प्रशिक्षण तळांवर हल्ला करून इस्रायलने हमासच्या कारवायांना प्रत्युत्तर दिले आहे.

हल्ल्याला प्रत्युत्तर

इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ले करण्याचा प्रयत्न होत आहे. इस्रायलच्या दिशेने हमासने रॉकेट डागण्याचा प्रयत्न केला असून इस्रायलच्या अँटि मिसाईल डोमने ते हल्ले परतवून लावले आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीत विमाने धाडून जोरदार बॉम्बवर्षाव केला आहे.

इस्रायलवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सरकारने दिला असून आता हमासकडून या हल्ल्याला काय प्रत्युत्तर मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष आहे. इस्त्रायलमधून पॅलेस्टिनी नागरिकांना हाकलण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला होता.

मे महिन्यात 11 दिवस झाली लढाई

मे महिन्यात इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर हमासनं इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली होती. इस्रायलवर हमासकडून हजारो रॉकेट्स डागण्यात आली होती. मात्र इस्रायलकडे अँटि मिसाइल यंत्रणा असल्यामुळे यातील बहुतांश रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात यश आलं होतं. त्यानंतर हमासवर इस्रायलनं काही Air Strike करून हमासचं मुख्य कार्यालय असणारी इमारत उडवली होती.

हे वाचा - Shocking! कोरोनाबाबत चीनला निर्दोष ठरवणारे बहुतांश शास्त्रज्ञ वुहानशी संबंधित

त्यानंतर हमासकडून बलून हल्ला करण्याचं प्रमाण वाढलं होतं. मधल्या काळात इस्रायलमध्ये सरकार बदललं. नवं सरकार हे कट्टर उजव्या विचारांचं असून पॅलेस्टाईनविरोधात कडक पवित्रा घेणारं असल्याचं मानलं जातं. सरकारनं सत्तेवर आल्यानंतर केलेल्या Air Strikeमधून हे सिद्धही केलं होतं. आता पुन्हा एकदा इस्रायलनं हमासवर हल्ला केला आहे.

First published:

Tags: Israel, Palestinian