मराठी बातम्या /बातम्या /विदेश /BREAKING: इराकचे पंतप्रधान Mustafa Al Kadhemi यांच्या घरावर Drone हल्ला 

BREAKING: इराकचे पंतप्रधान Mustafa Al Kadhemi यांच्या घरावर Drone हल्ला 

Mustafa al-Kadhemi-(File Photo : AFP)

Mustafa al-Kadhemi-(File Photo : AFP)

Iraq Prime Minister home target with Rocket: इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्या घरावर रॉकेट हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी (Iraq PM Mustafa al-Kadhemi) यांच्या घरावर ड्रोनने हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनच्या माध्यमातून इराकचे पंतप्रधान यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या हल्ल्यात इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी हे सुरक्षित आहेत. (Drone attack on Iraq PM Mustafa al-Kadhemi's Home)

या संदर्भात न्यूज एजन्सी एएफपीने ट्विट करत म्हटलं, बगदादच्या ग्रीन झोनमध्ये असलेल्या घरावर ड्रोन हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी म्हटलं, ते पूर्णपणे सुरक्षित आणि ठीक आहेत. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या ड्रोन हल्ल्यात काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. इराकच्या सैन्य दलाकडून या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करुन सांगण्यात आले आहे की, ही हल्ला ग्रीन झोन बगदाद येथे असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर करण्यात आला आहे.

हा हल्ला म्हणजे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांच्यावरील हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचेही इराकच्या सैन्याने म्हटले आहे.

वाचा : दोन महिन्यांच्या सोहेलला सोपवलं होतं अमेरिकन सैनिकाच्या हाती, अजूनही आहे बेपत्ता

हा ड्रोन हल्ला कुणी केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. तसेच आतापर्यंत या हल्ल्याची कुणीही जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली नाहीये. पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांचे निवासस्थान असलेल्या ग्रीन झोन परिसरात अनेक सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. येथे राहणाऱ्या परदेशी राजदूतांनी सांगितले की, हल्ला झाला त्यावेळी स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

शुक्रवारी, बगदादमधील ग्रीन झोन परिसरात ईरान समर्थक शिया समर्थक आणि स्थानिक पोलिसांत झडप झाली होती. यानंतर तेथे हिंसा सुद्धा झाली होती. या घटनेत एक आंदोलनकर्ता ठार झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीच्या पराभवानंतर विरोधकांनी पराभव नाकारला. इराण समर्थकांना या निवडणुकीत सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं झावं लागलं होतं.

इराकच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले होते. जखमी झालेल्यांपैकी बहुतांश हे दंगलविरोधी पोलीस दलाचे सदस्य होते. गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलक ग्रीन झोन परिसरात तळ ठोकून बसले आहेत.

First published:

Tags: Attack, Drone shooting